24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूरमांजरा खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पांचा अभ्यास करावा

मांजरा खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पांचा अभ्यास करावा

आमदार धिरज देशमुख यांच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला सूचना

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातील तावरजा, रायगव्हाण मध्यम प्रकल्प अद्याप कोरडेच असून रेणा मध्यम प्रकल्पातही अत्यल्प पाणीसाठा आहे. या तिन्ही प्रकल्पात पावसाचे पाणी वळवून त्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी अभ्यास करावा, अशा सूचना आमदार मा. धिरज विलासराव देशमुख यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिल्या.

पालकमंत्री मा. अमित देशमुख आणि आमदार मा. धिरज देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे लातूर येथे जलसंपदा विभागाचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण हे कार्यालय नुकतेच सुरू झाले आहे. या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी आमदार मा. धिरज देशमुख यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना केल्या.

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यातील काही प्रकल्प पूर्णत: व काही प्रकल्प अंशतः भरले आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाचा मांजरा प्रकल्प 70 टक्के भरला आहे. परतीचा पाऊसही चांगला बरसतोय. या गोष्टी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आहेत. असे असले तरी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तावरजा मध्यम प्रकल्प, रायगव्हाण मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. पावसाळा संपत आला तरी रेणा मध्यम प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. ही बाब चिंतेची असून येथील भौगोलिक रचनेचा अभ्यास करुन पावसाच्या पाण्याने हे प्रकल्प कसे भरतील? यासाठी कोणकोणत्या पर्यायांचा अवलंब करावा लागेल? याचा अभ्यास करण्याच्या सूचना आमदार धिरज देशमुख यांनी लातूर येथील जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिल्या आहेत.

मांजरा उपखोरे अति तुटीच्या प्रदेशात असल्याने प्रकल्पक्षेत्रात होणाऱ्या पावसावर मांजरा खोऱ्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरावे लागतील. तेव्हाच पाणीटंचाई व सिंचनाची समस्या कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास आहे. यासाठी आंतर खोरे वळण योजनांचा अभ्यास करण्याबाबत आमदार धिरज देशमुख यांनी प्राधिकरणास सुचित केले आहे.

तिहेरी तलाक; सायरा बानो भाजपात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या