25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरअति पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट

अति पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट

एकमत ऑनलाईन

जळकोट : यावर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये एक महिना पावसाने उघडीप दिली यामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि अवर्षण यात कापूस सावरतोय न सावरतोय तोच या कापसावर लाल्या रोगाने हल्ला केला. यामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे .असे असले तरी सध्या कापसाला प्रतीक्विटल साडेनऊ हजाराच्या वर भाव मिळत आहे. यामुळे शेतक-यांचे जे पांढरे सोने आहे यंदा चांगलाच भाव खाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे .

जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी जळकोट, विराळ कुणकी ,जगलपूर ,उमरगा रेतू , शेंलदरा , येलदरा वडगाव केकत सिं्ांदगी ,चाटेवाडी ,वांजरवाडा , धामणगाव ,जिरगा ढोरसांगवी ,बेळसांगवी ,पाटोदा बुद्रुक , पाटोदा खुर्द ,कोळनूर, करंजी तसेच परिसरातील पाखंडेवाडी ,नागर जांब ,गाढवेवाडी दग्रिस ,होंडाळा , दापका, जाम बुद्रुक, हिप्परगा आदी गावामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड दरवर्षी होत असते . गतवर्षी सोयाबीन पिकामध्ये मोठे नुकसान झाल्याने यावर्षी शेतक-यांनी आपला मोर्चा कापूस या पिकाकडे वळवला होता परंतु यावर्षी देखील कापसाने शेतक-यांची मोठी निराशा केली आहे . गतवर्षी कापसाला दहा हजार रुपये प्रतिक्वीिटल च्या वर भाव मिळाला होता यावर्षी देखील कापसाचा दर दहा हजाराच्या वर जाण्याची शक्यता बाजारात वर्तवली जात आहे . सध्या कापसाला प्रतिक्वीटल साडेनऊ हजार रुपये एवढा दर आहे . कापसाला भाव चांगला असला तरी शेतक-याच्या शेतामध्ये म्हणावा तेवढा कापूस नाही एकदा वेचणी झाली की कापसाच्या पळाट्या होत आहेत . शेतक-यांना यावर्षी अपेक्षा होती की प्रति बॅग निदान दहाकिं्वटल कापूस होईल परंतु यावर्षी कापूस तीन ते चारकिं्वटल एवढाच उतारा देत आहे .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या