चाकूर : प्रतिनिधी
सध्या स्मार्टफोनचा वापर कमालीचा वाढला असून दैनंदिन जीवनात मोबाईल महत्वाचा घटक बनला आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात गुरफटून गेली आहे. याचे अनेक दुष्परिणाम पुढे येत आहेत. मोबाईलमुळे वेळेच काहीच भान रहात नसून मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे जो-तो रिल्स पाहण्यात व बनविण्यात गुंतला आहे. मोबाईल वापरताना तो कशापद्धतीने वापरायचा आणि तो कितीवेळ वापरायचा याचा गांभीर्यपूर्वक विचार करण्याची वेळ आली आहे.
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. आजची तरुणाई रिल्समध्ये अडकून पडली आहे. व्हॉटस्प, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलीग्राम, ट्रिटर या गुंतवून ठेवणा-या गोष्टी आहेतच. एखादी रिल्स बघितली की, बोटे खाली-वर फिरतच राहतात असे मोबाईल वापरकर्ते तरुण-तरुणी तासनतास रिल्स पाहण्यात मग्ण असतात. यातून वेळ मिळाल्यास रिल्स बनवण्यात गुरफटलेले असतात. अतिवापरामुळे त्यांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागणार आहे. यात तिळमात्र शंका नाही, मोबाईलचा वापर फक्त तरुण मुल, मुलीच करतात असे नाही तर ते सर्वांच्या मनोरंजानाचे महत्त्वाचे साधन बनले आहे, यामध्ये युवक-यवती, नागरिक मोबाईलमध्ये डोके घालून बसत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम विद्यार्थी आणि कर्मचारी, अधिकारी, नागरिकांवर होत आहे.
मोबाईलमुळे रात्रीचे जागरण वाढले
तरुण मुले, मुली पूर्वी अभ्यास करण्यासाठी रात्री जागरण करीत असत मात्र सध्या विद्यार्थीच नव्हे, तर नागरिकदेखील फेसबुक, व्हॉटसप व रिल्स पाहण्यात दंग होऊन रात्रीचे कामे बाजूला ठेवून रिल्स पाहण्यात गुंतलेले असतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांना रिल्सने उशिरापर्यंत जागरण करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्रित बसल्यानंतरही गप्पागोष्टी,संवाद बंद झाला आहे.