24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर डॉ.निलंगेकर यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला

डॉ.निलंगेकर यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला

एकमत ऑनलाईन

निलंगा : राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महिला व बालकल्याणमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा येथील अशोक बंगल्यावर भेट देऊन डॉ. निलंगेकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र पोरका झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशसरचिटनिस अशोकराव पाटील निलंगेकर , माजी मंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ शरद पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. अरुण डावळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके, माजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकट बेंद्रे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, बी.व्ही. मोतीपवळे हे उपस्थित होते.

पाटबंधारेच्या इतिहासात डॉ. निलंगेकराचे अग्रक्रमाने राहील: थोरात
आदरणीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे आमच्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व असून त्यांच्या जाण्याने सबंध महाराष्ट्र पोरका झाला आहे, ज्यावेळी महाराष्ट्राचा पाटबंधारेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी डॉ.निलंगेकर यांचे नाव अग्रक्रमाने लिहिले जाईल. थोरात म्हणाले की, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीमध्ये त्यांचा सिंंहाचा वाटा आहे. ते महाराष्ट्रासाठी आदरणीय होते महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते.

पक्षावर निष्ठा ,काँग्रेस नेतृत्वावर प्रेम व त्यांच्या विचाराच्या माध्यमातून सिंंचनावर खूप मोठी कामगिरी त्यांनी केली. ज्या-ज्या विभागात काम केले. तिथे त्यांनी आपला ठसा उमटविला. आदरणीय दादासाहेबांनी स्वत:च्या पुढाकारातून महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जे की सध्या विदर्भात आहे असे गोशीखुर्द धरणाची निर्मिती केली. त्यामुळे भंडारा गोंदिया, चंद्रपूर ,नागपूर, गडचिरोली या परिसरात हरितक्रांती झाली. यशवंतराव चव्हाण वसंतराव पाटील व आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाढलो त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गक्रमण करीत आहोत. त्यांच्यासोबत सर्वाधिक विधानसभेचा कालावधी घालवला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ.निलंगेकर साहेबांकडून बरेच काही शिकायला मिळाले : पालकमंत्री
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, माझा विधानसभेचा प्रवेश झाला त्यावेळी डॉ निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला बरेच काही शिकायला मिळाले.आदरणीय डॉ. निलंगेकर,स्वर्गवासी विलासरावजी देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर या त्रीमूर्तीनी लातूर जिल्ह्याचा कायापालट केला. त्यामध्ये निलंगेकर यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निलंगेकर यांचे राजकारण आदर्शवत: ठाकूर
महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आदरणीय निलंगेकर यांच्या राजकारणातील काम करण्याच्या बारकावे समजून घेऊन ते शिकता आले पाहिजे हे आदर्श आम्ही आजच्या पिढीने ठेवले पाहिजे अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Read More  आंतरराज्य सीमेवर कडक निगराणी ठेवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या