27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरआज दसरा उत्साहात साजरा होणार

आज दसरा उत्साहात साजरा होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
साडेतीन शुभ मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेला विजयादशमीचा सण आज दि. ५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या सणासाठी लागणा-या विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी असल्याचे चित्र मंगळवारी बाजार पेठेत होते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दसरा सार्वजनिक स्वरुपात साजरा करता आलेला नव्हता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ब-यापैकी ओसरल्याने दसरा सार्वजनिक स्वरुपात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे.

शहरातील गंजगोलाई, सराफ लाईन, भूसार लाईन, कापड लाईन, मेन रोड, दयानंद गेट, औसा रोड, अंबाजोगाई रोड आदी परिसरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. सुभाष चौकासह दयानंद गेट, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, जुना, नवीन रेणापूर नाका, राजीव गांधी चौक आदी परिसरात फुलांचा बाजार बहरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या किंमतीमध्ये एक पैसाही वाढ झाली न्सल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले. विजयादशमीच्या पूजेसाठी व वाहने सजविण्यासाठी झेंडू, गुलाब, शेवंती, चिनी गुलाब, सुपारी फुल, पिवळी शेवंती, निशिगंधा आदी फुलांना मागणी असते. यंदा झेंडू ८० ते ९० रुपये किलो दराने विकले जात असून शेवंतीचा दर १३० ते २५० रुपये, सुपारी फुल ६० ते ८० रुपये, गुलाब २६० रुपये, पिवळी शेवंती १५० रुपये ते २९० रुपये किलो तर निशिगंधा म्हणजेच गुलछडीचा भाव २३० ते २८० रुपये किलो असल्याचे फुल विके्रत्यांकडून सांगण्यात येते.

यंदा झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली तरी पावसाच्या संततधारेमुळे व अतिवृष्टीने त्याचे नुकसान झाले आहे. झेंडू फु लाच्या प्रतवारीवर या पावसाचा परिणाम झाल्याने या फु लाच्या भावावर त्याचा परिणाम झाला आहे. गत वर्षी १५० रुपये किलो दराने विकलेली फु ले मंगळवारी सकाळी ८० रुपये तर दुपारनंतर तीच फु ले ४० ते ५० रुपयांने विकली गेली. पावसामुळे फु लाची प्रतवारी निष्कृष्ट झाल्याने फु लांना यंदा उठावच मिळाला नाही, असे एका व्यापा-याने सांगीतले. एका व्यापा-याने नांदेडच्या आडत बाजारातून लातूर शहरात झेंडूची फु ले विक्रीसाठी आणली परंतू, त्याचा वाहतूक खर्चही निघाला नाही, असे फुल विक्रेत्याने सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या