लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख जयंती निमित्त विलासराव देशमुख विचारमंचतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि २४ व २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पुजा भवन, स्टीम एज्युकेशन पी. व्ही. आर. थियेटर पाठीमागे येथे ‘आठवणीत साहेबांच्या’ सुगम गायन व काव्य गझल आयोजित करण्यात आली आहे.
दि २४ रोजी सायं ६ वाजता इंडीयन आयडॉल अंजली गायकवाड व पं. अंगद गायकवाड यांचे सुगम गायन आयोजित करण्यात आले आहे. तर दि २५ रोजी महाराष्ट्रातील नामवंत कवी, कवयत्री यांच्या काव्य गझलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईहून कवी जयेश पवार, सिल्लोडहून शब्बीर शेख, कळंबहून शेखर गिरी, उदगीरहून श्रीगण रेड्डी, वलांडीहून अझर शेख, लातूरहून वंदना केंद्रे सहभागी होणार आहेत. या काव्यगझल कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी योगीराज माने हे करतील. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हे विविध कार्यक्रम होणार आहेत.
लातूरातील कला रसीक मंडळी व लातूरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विलासराव देशमुख विचारमंचातर्फे सोनू डगवाले, डॉ. अरविंद भांताब्रे, सुपर्ण जगताप, ओमप्रकाश झुरुळे, प्रवीण पाटील, एकनाथ पाटील, प्रवीण सुर्यवंशी, दीपरत्न निलंगेकर, प्रा. एम. पी. देशमुख, हमीद शेख, सचिन दाताळ, वेताळेश्वर बावगे, संजय निलेगावकर, डॉ. बी. आर. पाटील, अमृत सोनवणे, बालाजी सांळुके, अॅड. सुनील गायकवाड, हेमंत रामढवे, राम स्वामी, बालाजी पिंपळे, सुलेखा कारेपुरकर, महेश बिडवे, पद्माकर वाघमारे, आण्णासाहेब शिंदे, अमोल इंगळे यांनी केले आहे.