शिरूर अनंतपाळ : शिक्षण हे मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाचे एक मूलभूत साधन आहे हा विचार आता सर्वमान्य झाला आहे. शिक्षण हे परिवर्तन व विकासाचे एकमेव साधन असून विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये सातत्य ठेवून पुढील मार्गक्रमण करावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव जे.जी.सगरे यांनी केले. तालुक्यातील कांबळगा येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ बोरीचे संस्थापक सचिव जे.जी.सगरे हे होते.
तर मंचावर माजी जि.प. सदस्य ऋषीकेश बद्दे, बोरी सोसायटीचे संचालक एकनाथ केजकर, कमला नेहरू प्राथमिक विद्यालय बोरीचे मुख्याध्यापक आर. एस.शिंगडे व आर. जी.नाईकनवरे उपस्थित होते. याप्रसंगी दहावीतून तिरमली वैष्णवी ज्ञानोबा प्रथम, गुम्मे गणेश लक्ष्मण द्वितीय व बोनवळे सुमित महादेव तृतीय तर बारावी कला शाखेतून शेख मेहर मैनुद्दीन प्रथम, विठूबोने दिपाली बालाजी द्वितीय, चोपडे हरीश हनुमंत तृतीय तसेच विज्ञान शाखेतून सावळे सचिन बालाजी प्रथम, नाईकनवरे मानसी राजेंद्र द्वितीय व देशमुख यशवंत बालाजी, पेठे वेदांत राजकुमार तृतीय या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलत असताना ऋषिकेश बद्दे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या माध्यमातून आपले नावलौकिक करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्राचार्य एन.जी.शेख, सूत्रसंचालन पठाण जे. एच. यांनी तर पठाण जे.पी.यांनी आभार व्यक्त केले.