21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरशेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावा

शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत बहुतांश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी काँगेसच्या ताब्यात आल्या असून जिल्ह्यांत जवळपास २५० पैकी २३५ ठिकाणी काँग्रेस विचारांचे पॅनल विजयी झाले आहेत. लातूर तालुक्यातील एकूर्गा, सावरगाव, आंबेगाव येथील निवडून आलेल्या सोसायटी संचालक मंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आशियाना निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या हस्ते नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, जिल्हा बँक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा सूचना नवनिर्वाचित सदस्यांना दिल्या आहेत.

लातूर तालुक्यातील एकुर्गा सोसायटीत विलासराव देशमुख शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून यामध्ये निवडून आलेल्या विश्वनाथ स्वामी, गोविंद पटाडे, राहुल पाटील, विष्णू पटाडे, नानासाहेब रसाळ, संगीता नानासाहेब घुटे, प्रभावती नागटिळक, यमुनाबाई पटाडे यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी विलास साखर कारखान्याचे संचालक नारायण पाटील, विश्वनाथ पाटील, विठोबा कोरके, जालिंदर गुटे, विश्वनाथ कोरके, नंदकुमार नागटिळक आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच सावरगाव, निलंगा तालुक्यातील आंबेगाव विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक अँड. श्रीपतराव काकडे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, अँड. बाबासाहेब गायकवाड, मोईज शेख, चांदपाशा इनामदार, सचिन दाताळ, हरीराम कुलकर्णी, सुपर्ण जगताप, राजेंद्र भोसले, उदयसिंह देशमुख, सुधीर पाटील, रामराव पाटील आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या