23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरईद-उल-अजहा उत्साहात साजरी

ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह जिल्ह्यात दि. १० जुलै रोजी ईद-उल-अजहा (बकरी ईद) पारंपारीक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. रविवारीही पाऊस होता. त्यामुळे शहरातील सर्वच मस्जिदांमधून ईदची नमाज झाली. ईदगावरही नमाज झाली. गतवर्षी कोरोनामुळे बकरी ईद सार्वजनिकरित्या साजरी करता आलेली नव्हती. मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरी नमाज अदा करुन ईद साजरी केली होती. यंदा मात्र कोरोना ओसरल्यामुळे बकरी ईद सार्वजनिक स्वरुपात ईद साजरी करण्यात आली. परंतू, गेल्या तीन-चार दिवसांपासून लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संततधार भिजपाऊस सुरु आहे.

रविवारीही सकाळी पावसाची रिमझीम सुरुच होती. पडणार पाऊस लक्षात घेता शहरातील सर्वच मस्जिदींमधून ईदची नमाज तसेच ईदगाहवरही ईदची नमाज अदा करण्याचा निर्णय मरकज मस्जिदमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानिर्णयानुसार शहरातील मस्जिदींमधून सकाळी ८.३० वाजता ईदची नमाज झाली. ईदगाहवर सकाळी ९.३० वाजता ईदची नमाज झाली. शहरातील ईदगाहवर सकाळी ९ वाजता हाफीज अब्दूल जब्बार मजाहिरी यांचे प्रवचन (बयान) झाले.

त्यांनी आपल्या प्रवचनात ईद-उल-अजहा (बकरी ईद) संबंधी माहिती सांगुन ईद-उल-अजहाचे ईस्लाम धर्मातील महत्व, ईद-उल-अजहा कशी साजरी करावी, या संदर्भाने सांगीतले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता मुफती साबेर खान कास्मी यांच्या मागे ईद-उल-अजहाची नमाज झाली. नमाजनंतर मुफती साबेर खान कास्मी यांनी सर्व मानवी जीवन सुखी, समाधानी व्हावे, प्रत्येकाचे जीवन आरोग्यदायी व्हावे, नुकसान न कारता नफा देणारा पाऊस पडावा, अशी अल्लाहकडे प्रार्थना केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या