22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूर‘एकमत’ चा स्नेहमेळावा उत्साहात

‘एकमत’ चा स्नेहमेळावा उत्साहात

एकमत ऑनलाईन

लातूर : एकमतच्या ३१ व्या वर्धापनदिन सोहळ््यानिमित्त येथील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात एकमतच्या मार्गदर्शक श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडलेल्या स्नेहमेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी एकमतवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या जिल्ह्यातील ५४ मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान सोहळाही पार पडला. लातूरच्या मातीतील असामान्य व्यक्तींच्या या सन्मान सोहळ््याला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एकमतच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळावा आणि कृतज्ञता सन्मान सोहळ््याला माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, डॉ. सारिका देशमुख, कॉंग्रेस नेते अभय साळुंके, प्रभाकर सुडे, एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर उपस्थित होते. सर्वप्रथम एकमतचे संस्थापक विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर यंदाही कृषी, ग्रामविकास, समाजकार्य, वैद्यकीय उद्योग, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक, क्रीडा, व्यावसायिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून आपला आगळावेगळा ठसा उमटविणा-या जिल्ह्यातील ५४ मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. कारण अशा आगळ््यावेगळ््या रत्नांच्या जोरावरच जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे. त्यांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला.

प्रारंभी प्रास्ताविकात संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांनी एकमतच्या ३१ वर्षांच्या वाटचालीचा इतिहास मांडताना लोकनेते विलासराव देशमुख यांनी एकमतची मुहूर्तमेढ रोवताना सामाजिक बांधिलकीतून वृत्तपत्र सुरू करीत असल्याचे म्हटले होते. तोच वसा आणि वारसा घेऊन एकमतची वाटचाल सुरू असून, तीन दशके संपवून आता एकमतची वाटचाल चौथ्या दशकाच्या दिशेने यशस्वीपणे सुरू असल्याचे म्हटले. विलासराव देशमुख साहेबांच्या पाठबळाच्या जोरावर मागच्या ३१ वर्षांत एकमत वाढला आणि फोफावला आणि त्यांच्या पश्चातदेखील श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या पाठबळाच्या जोरावर कोरोनासारख्या संकटावर मात करून तगला नव्हे, ताठ मानेने उभा राहिला, याचा आनंद असल्याचे म्हटले.

यावेळी अभय साळुंके यांनी कृतज्ञता सन्मानार्थीचे तोंड भरून कौतुक करतानाच लोकनेते विलासराव देशमुख आजही कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्यासोबत आहेत. त्यांनी उभारलेल्या एकमतरुपी वटवृक्षामुळेच आज स्वकर्तृत्वावर ठसा उमटविणा-या अनेक लोकांचा येथे सत्कार झाला. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि प्रत्येक क्षेत्रात आपला नावलौकिक वाढो, अशा शुभेच्छा दिल्या. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी एकमतच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देतानाच ज्या एकमतने आपल्यात लहानपणापासून संस्कार रुजवले. त्याच एकमतच्या व्यासपीठावरून मला सत्काराचे भाग्य लाभले, असे म्हटले. तसेच विलासराव देशमुख साहेबांनी ज्याला हात लावला, त्याचे सोने केले. एकमतचेही तेच झाले. परंतु त्यांच्या पश्चात आईसाहेब खंबीरपणे एकमतची धुरा सांभाळताहेत. त्यामुळेच एकमतची वाटचाल सक्षमपणे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी निस्वार्थ लोकसेवा देतानाच येथील रत्नांना एक वेगळी ओळख देण्याच्या उद्देशाने विकासरत्न विलासराव देशमुख यांनी एकमतची मुहूर्तमेढ रोवली. त्याचा आज ३१ वा वर्धापनदिन होतोय, याचा मला आनंद आहे. याचे श्रेय मी एकमतच्या टीमलाच देते. परंतु या निमित्ताने एकमत आणि देशमुख परिवारावर जो प्रेमाचा वर्षाव केला, ते पाहून मी अक्षरश: भारावून गेल्याचे सांगितले. कृतज्ञता सन्मानार्थीच्या वतीने प्रा. डॉ. गजेंद्र तरंगे, बालाजी सुळ, किरण कोरे, सतीश पांचाळ, चंद्रशेखर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येकांनीच लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या. बाळकृष्ण धायगुडे यांनी अतिशय खुमासदारपणे सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन एकमतचे जिल्हा प्रतिनिधी एजाज शेख यांनी केले.

एकमत, देशमुख परिवारावर कायम असेच प्रेम राहू द्या

श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी एकमतवरील प्रेम आणि देशमुख परिवाराबद्दल आस्था पाहून माझे मन भरून आले. एवढेच नव्हे, तर हे सर्व पाहून आपण भारावून गेलो आहोत. देशमुख परिवारावर अशीच माया कायम ठेवावी. लातूरची कॉंग्रेस हे आमचे घर आणि परिवार आहे. त्यामुळे कोणाचे काहीही काम असले, तरी आमचे दरवाजे लातूरकरांसाठी सदैव उघडे आहेत. यापुढेही जीवात जीव असेपर्यंत लातूरकरांच्या हितासाठी सदैव कार्य करीत राहू, असे सांगतानाच एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर आणि एकमतच्या सर्व टीमचे कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या