24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeलातूरएकुरका (खुर्द) गाव महिन्यात कोरोनामुक्त

एकुरका (खुर्द) गाव महिन्यात कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तालुक्यातील एकुर्का खुर्द गावात तब्बल ८५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते.जवळपास या गावात ८५ कोरोना रुग्ण आढळून आले होते. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही यामुळे एकुरका खुर्द हे गाव एक महिन्यामध्ये कोरोनामुक्त झाले आहेत . प्रशासनाचे योग्य नियोजन व गावक-यांचे सहकार्य यामुळे या गावात आजमितीस एकही कोरोनाचा रुग्ण नाही.

जळकोट तालुक्यातील एकुरका खुर्द हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले होते, एकट्या गावात ८५ रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, एवढे रुग्ण एकाच दिवशी वाढले नाही तर टप्प्याटप्प्याने वाढले होते तसेच टप्प्याटप्प्याने या गावातील कोरोनाचे रुग्ण कमी झाले. तालुक्यातील एकुरका खुर्द गावात होळी तसेच रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली तसेच या निमित्त गावांत अनेक जण एकत्र येऊन टिप-याचा कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे अनेक जण एकत्र येऊन पूर्ण गावाला कोरोना झाला होता. त्यानंतर मात्र प्रशासनाने या ठिकाणी कडक निर्बंध लावत संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. त्यानंतर गावक-यांनीही प्रशासनाला सहकार्य केले घरातून बाहेर निघताना मास्क वापरणे, एकमेकाच्या संपर्कात न येणे, एकमेकाच्या घरी न जाणे, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, असे उपक्रम गावक-यांनी राबविल्यामुळे आज हे गाव कोरोना मुक्त झाले आहे.

या गावातील आरोग्य कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली होती असे असले तरी बाहेरून कर्मचारी मागून घेऊन या गावातील २८० जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यामुळेच गावात कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागले होते. सुरूवातीला गावातील महिलेचे निधन झाले. यानंतर या घरातील सर्व जण कोरोना पॉझीटीव निघाले लगेच काही दिवसानंतर आणखीन एका महिलेचे निधन झाले. यानंतर प्रशासनाने गावातील नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली.

सर्व उपाययोजनानंतर एक महिन्यानंतर या गावात एकही कोरोनाचा रुग्ण नाही . या गावावर तहसीलदार संदीप कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, उपनिरिक्षक बोईनवाड, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरेश्वर सुळे यांचे बारकाईने लक्ष होते. येथील सरपंच पांडुरंग केंद्रे यांनीही प्रशासनाला सहकार्य केले तसेच ग्रामसेवक नागनाथ स्वामी, तलाठी भिसे , तसेच आरोग्य कर्मचा-यानी मार्गदर्शन केले.

विनाकारण फिरणा-या नागरिकांची ‘कोरोना’ चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या