किनगाव: प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे तिर्रट नावाच्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारून जुगाराच्या साहित्यासह दोन लाख सहा हजार रुपयाचा माल जप्त करून अकरा जणांना अटक केली दि ३ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. खंडाळी बस स्थानक बसस्थानक बाजूच्या चहा हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तिर्रट नावाचा जुगार चालत असल्याची माहिती मिळाली.
यावरून सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.सी जाधव,एम.जी ढाकणे ,पोलीस नाईक देवळे, या धाड घालून आरोपी शिवाजी श्रीधर पौळ, मंगेश दत्तात्रय शेळके, राहुल नारायण पोले, माधव ज्ञानोबा मुसळे, पद्माकर श्रीधर पौळ, बापुराव सुधाकर शेळके, राम बालाजी कांबळे, ओमकार दत्तात्रय पौळ, वसंत गुंडाजी पौळ, लक्ष्मण दशरथ कांबळे, बालासाहेब रामदास पौळ, सर्व रा.खंडाळी व काही जण बाहेर गावातील यांच्यावर धाड घालून जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य व रोख रक्कम पंधरा हजार तीनशे साठ रुपये व घटनास्थळावर मिळालेल्या चार दुचाकीकिंमत ९००० रुपये असा एकूण दोन लाख पाच हजार पाचशे साठ रुपयांचा ऐवज जप केला. अधिक तपास पोहे का देवळे हे करीत आहेत.