22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरतगरखेडा येथे पावसासाठी अकरा मारुतींना साकडे

तगरखेडा येथे पावसासाठी अकरा मारुतींना साकडे

एकमत ऑनलाईन

निलंगा : जुन महिना संपला तरी अधापही तालुक्यातील तगरखेडा औराद शहाजानीसह परीसरातील गावामध्ये पाऊस पडलेला नाही पेरणी योग्य पाऊस पडवा म्हणून तगरखेडा येथील ग्रामस्थांनी भजन करीत पायी चालत परीसरातील तगरखेडा, औराद शहाजानी, सावरी, संगारेड्डीवाडी, सगरेवाडी, जिरबावाडी, कोयाचीवाडी, माकणी थोर, शिरसी हंगरागा, राजेवाडी, हलगरा येथील मारुती मंदिरात हानुमानाला पाणी घातले.

तगरखेडा ग्रामस्थांच्या वतीने पायी भजन करीत डोक्यावर घागरी भरुन चालत जाऊन पाणी घालून मारुती मंदिर येथे साकडे घातले. यात नागनाथ बिराजदार, अशोक पांचाळ, शेषराव बिरादार, सुरेश बिरादार, नरंिसग तिफनबणे, संजय पाटील, विजय हरंगुळे , माधव बिरादार, माधव मुळजे, धरमा जेकेकुर, नंदकिशोर कुभांर, सुरेश बोरसुरे, मनोज स्वामी, डिगंबर बिरादार, अनिल बोरसुरे, पंडीत बाकारे, दत्ता बिरादार, हणमंत डावरगावे, बाबु बाकारे, व्यंकट घायाळ, शिवाजी बिरादार आदीसह तगरखेडा येथील नागरिक सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या