34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरनिलंग्यात अतिक्रमण मोहीम सुरूच

निलंग्यात अतिक्रमण मोहीम सुरूच

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा नगर पालिकेमार्फत अतिक्रमण मोहिमेचा दि ५ मार्च रोजी दुसरा टप्पा असून शहरातील रस्त्या शेजारी व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात येत आहेत. बुधवारी अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली असून निलंग्याचा आठवडी बाजार असल्याने एक दिवस ही मोहीम बंद ठेवण्यात आली होती मात्र शुक्रवारी पुन्हा या मोहिमेस सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजीनगर हाडगा रोड येथून सुरूझालेली मोहीम थेट जिजाऊ चौक ते उदगीर मोड पर्यंत शहराच्या उत्तर बाजूची अतिक्रमणे काढण्यात आली तर शुक्रवारी उदगीर रोड येथून शहरातील दक्षिण बाजूचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू आहे.

यावेळी व्यवसायिकांनी आपल्या दुकानाच्या जागेवर अतिरिक्त रस्त्यावर दुकानचे बोर्ड लावणे, रस्त्यावर पार्किंगचा उपयोग करणे दुकानाचे साहित्य रस्त्यावर लावणे असे अनेक प्रकारचे अतिक्रमण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आले. यावेळी दुकानदार व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पालिका कर्मचा-यांना अतिक्रमण हटाव करण्यापासून विरोध करण्यात आला मात्र नगरपालिकेचे कडक धोरण राबविल्यामुळे ख-या अर्थाने स्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण काढल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्­वास घेतला.

शंभर कर्मचा-यांची कुमक
लातूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये निलंगा पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांच्यासह साधारणत: शंभर महिला व पुरुष कर्मचारी, एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर यांचा या मोहिमेत समावेश होता

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या