24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरअहमदपूर नगर परिषदेच्या दोन एकर जागेवर अतिक्रमण

अहमदपूर नगर परिषदेच्या दोन एकर जागेवर अतिक्रमण

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : येथील तहसील कार्यालय व शासकीय रुग्णालयाच्यासमोरील मोक्याच्या जागेवर असलेली व जुन्या नगर परिषद परिसरातील व चोरटांगी भागातील जागेवर नगरपरिषदेची किमान दोन एकर जागा असून या जागेवर लोकांनी शेड मारून किमान तीस वर्षांंपासून व्यवसाय थाटला आहे. या परिसरात किमान दोनशे दुकाने असून या पैकी किती लोकांनी नगर परिषदेमध्ये भाडे पावती घेतली आहे हे मात्र समजू शकले नाही.ही सर्व दुकानाची जागा रिकामी करण्यासाठी नगर परिषदेकडून सर्वांना नोटीस देण्यात आलेली आहे.

येथील नगरपरिषदेची सर्वे नंबर ३९ मध्ये जवळपास दोन एकर जागेवर लोकांनी शेड मारून आपले व्यवसाय गेल्या तीस वर्षांपासून सुरू केले आहेत. यातील अनेक लोकांनी नगरपरिषदेकडून आपल्या नावावर दुकानाची जागा घेऊन तेथे शेड मारून ते इतर पोट भाडेकरूंना जास्तीचे भाडे घेऊन किरायाने दिलेले आहेत. येथे असे अनेक पोटभाडेकरू व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. या नगरपरिषदेच्या जागेवरील काही लोकांनी आपली दुकाने इतरांना लाखो रुपये घेऊन विकल्याचेही समजते.

येथील नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे यांचे येथे काही चालत नाही. येथे प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांंची नियुक्ती करण्यात आली आहे. या नगर परिषदेच्या सर्वे नंबर ३९ या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी या भागातील जवळपास दोनशे दुकानदारांपैकी १५६ दुकानदारांना दि २७ मेपासून नोटीस वाटप करण्यात येऊन दुकानदारांनी स्वत:हून सात दिवसात शेड काढून घ्यावे अन्यथा नोटीसीच्या अंमलबजावणीसाठी कसूर केल्यास नगरपरिषदेमार्फत कार्यवाही करण्यात येऊन त्याचा खर्च दुकानदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याचे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच पोस्ट ऑफिस रोडवर नगरपरिषदेच्या जागेवर अनेकांनी शेड मारून आपला व्यवसाय काही व्यापारी तेथे करीत आहेत पण या जागेचा वाद सध्या न्यायालयात सुरू असल्यामुळे येथील दुकाने आतातरी काढणार नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान या नगरपरिषदेच्या जागेवर असलेल्या व्यापा-­यांचे म्हणण्यानुसार जोपर्यंत या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यासाठी शासनाचा निधी मंजूर होत नाह.ी तोपर्यंत तरी आम्हाला तिथून काढू नये. ज्या वेळेस तेथे व्यापारी संकुलाचे बांधकाम होईल तेव्हा ज्या जागेवर आता आमची दुकान आहेत तेथे आम्हाला पुन्हा भाड्यााने ते दुकान देण्यात
यावे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या