25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर पोळ्याच्या खरेदीसाठी उत्साह

पोळ्याच्या खरेदीसाठी उत्साह

एकमत ऑनलाईन

लातूर (प्रतिनिधी) : यावर्षी जिल्हयात पाऊस मोठा नसला तरी पिकांच्या वाढीपुरता झाल्याने बळीराजा आनंदात आहे. पोळयाच्या सण उत्साहात साजरा करण्यासाठी लातूरची बाजार पेठ सुरू होताच बैलाचा सण साजरा करण्यासाठी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी सोमवारी शेतक-यांनी गर्दी केल्याचे पाहयला मिळाले.

लातूर जिल्हयात दरवर्षी जोरदार पावस होऊन प्रवाही पाण्यात गाय, वसरे व बैलांना स्वच्छ धुवून पोळयाच्या मिरवणूकीसाठी तयार केले जाते. मात्र यावर्षी पिकांचीच तहान भागेल इतकाच पाऊस सध्या जिल्हयात होत आहे. त्यामुळे आजूनही नदी नाले कोरडेच आहेत. गेल्या आडीच महिन्यात जो पाऊस झाला तो रिमझिम व मध्यम स्वरूपाचाच आहे. या रिमझिम पावसावर खरीप पीके जगली. अशा कठीण परिस्थितीतही शेतक-यांनी बैल पोळयाच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतक-यांनी लातूरच्या बाजार पेठेत बैलांच्या सजावटींचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

लातूरच्या बाजार पेठेत बैलांच्या साहित्य खरेदीसाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली होती. यात रेशीम काळे, पांढरे सूत १२० रूपये किलो, कलर रेशीम सूत १६० रूपये किलो, पोट कंडरी १० रूपये ते १०० रूपये प्रति नग, गळ कंडे विविध प्रकारचे प्रति नग १० ते १०० रूपये, मटाटया ५० ते ४०० रूपयांपर्यंत जोडी, बैल पट्टा, तिरंगी पट्टा ३० ते १०० रूपये प्रति नग, पैंजन १०० ते ४०० रूपयांपर्यंत प्रति जोडी, शिंग चौरी ५ ते १० रूपये प्रति नग, पितळी शेंबी ५०० रूपये प्रति नग, कासरा १२० रूपये प्रति नग, वेसन १० ते २० रूपये प्रति नग, मोरक्या ५० ते १०० रूपये प्रति नग, चंगाळे ७०, १०० रूपये प्रति नग, बाशिंग १२० रूपये जोडी, झूली १ हजार २०० ते ३ हजार २०० रूपये प्रति नग, तसेच कवडी ७० ते १०० रूपये प्रति नग प्रमाणे बाजार पेठेत विक्रीसाठी आली होती.

बैलांची खंदमळणी
बळीराज्याच्या शेतात वर्षभर राबराब राबणा-या बैलांचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी शेतक-यांमध्ये उत्साह आहे. बैलांच्या पोळयाच्या पूर्व संध्येला सोमवारी खंदामळणी दिवशी शेतक-यांनी बैल, गाय, वासरे आदींंना स्वच्छ धुण्यात आले. सायंकाळी बैलांची पुजा करून खांद्याला मळी लावण्यात आली. तसेच मंगळवारी पोळयाच्या सणा दिवशी बैलांना गोडधोडही खाण्यासाठी देण्यात येणार आहे.

साहित्याचे भाव स्थिर
यावर्षी बळीराज्याच्या शेतात पिकपाणी चांगले असल्याने शेतक-यांनी बैल पोळयाच्या सणासाठी बाजारपेठेत गेल्या दोन दिवसापासून गर्दी केली आहे. साहित्य खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. मात्र यावर्षी बैलांच्या सजावटीच्या साहित्याचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती भूजंग पवार यांनी दिली.

अखंड स्थितीचा निर्धारु, स्थिरचित्त धोनी!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या