23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरखरीप-२०२२ हंगामासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना

खरीप-२०२२ हंगामासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सद्यस्थितीला निर्माण झालेल्या परस्थितीत खत, बियाणे, कीटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी तसेच गुणवत्ते संदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या नियंत्रण कक्षामध्ये सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत शेतक-यांना आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दीद्वारे कळविले आहे.

बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी आल्याचे निर्दशनात येत आहेत. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर खते व कीटकनाशक विक्रते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळेनिर्माण झालेल्या खत टंचाईच्या अनुषंगाने निविष्ठा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्याचे विक्री नियंत्रण करणे आवश्यक आहे.

बियाणे, खते व कीटकनाशक यांच्या गुणवत्ता व पाठपुरवठ्याच्या अनुषंगाने येणा-या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी- ९४०५६५३०४६ असेल. सोबतच अडचणकिंवा तक्रार २िंङ्म’ं३४१@१ी्िराों्र’.ूङ्मे या इ-मेल आयडीवर सुद्धा मेलद्वारे पाठवता, नोंदवता येईल, असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या