26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरदुबार पेरणीनंतरही बियाणे उगवलेच नाही

दुबार पेरणीनंतरही बियाणे उगवलेच नाही

एकमत ऑनलाईन

निटूर : प्रतिनिधी
निटूर परीसरावर प्रती वर्षापेक्षा पहिल्या टप्पात म्हनजेच जुन-जुलै मध्ये प्रतीवर्षापेक्षा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. शेतक-यांनी कसलीच हाईगाई न करता पेरणी केली. लागलीच मुसळधार पाऊस झाला. त्या पावसात बराच शेतक-यांनी पेरलेल्या बियानांची ऊगवनच झाली नाही.

ज्या शेतक-यांची ऊगवन झाली नाही. त्यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणी करूनही पुन्हा बियाणे उगवलेच नाही. आता मात्र निसर्गच आपल्यावर कोपला आहे, असे म्हणुन त्यांनी पुन्हा न पेरता तसीच काळी जमीन रबीसाठी मोकळीच ठेवली. रबीला पेरणीसाठी झालेला खर्च आणि पुन्हा रबीच घरी यायचे ऊत्पन्न दोन्हीकडुन नुकसानीला मुकल्याच नुकसानग्रस्त शेतकरी धोंडीराम साळुके, त्र्यंबक तत्­तापुरे, आबा माळी, महेबुब शेख, ज्ञनोबा फुले यांनी बोलताना सांगुन या सर्व शेतक-यांचे पंचनामे करून त्याना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागनी शेतकरी करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या