लातूर : लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता दि़ १५ ते ३० जूलै या कालावधीत लातूर जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ हे लॉकडाऊन कडक असेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला होता़ त्यास प्रतिसाद देत लातुरकरांनी शुक्रवारचा तिसराही दिवस कडकडीत बंद पाळला़ संपूर्ण लातूर घरात असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहेत़ दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ़ राजेंद्र माने यांच्यासह पोलिसांनी संपूर्ण शहर पिंजून काढले आहे.
प्रारंभीच्या एक, दोन, तीन लॉकडाऊनपर्यंत लातूर जिल्ह्यातील कोरोाबाधितांची संख्या अतिश्य नगण्य होती़ लातूरकरांनी अतिश्य काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी शासन, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोर पालन केले होते़ गावागावात अॅन्टी कोरोना फोर्स कार्यरत होते़ शहराच्या ठिकाणी पोलीस आणि इतर यंत्रणा कार्यरत होती़ इतर जिल्ह्यातील एकही व्यक्ती आपल्या जिल्ह्यात, शहरात, गावात, गल्लीत येणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली गेली.
यंत्रणेतील प्रत्येक जण या कामात झोकुन देऊन काम करीत राहिला़ त्यास नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला़ त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात लातूर शहरासह जिल्ह्याला बºयापैकी यश मिळाले होते़ दरम्यान केंद्र सरकारने त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिली़ त्यानंतर मात्र कोरोना विषयीचे लातूर जिल्ह्याचे चित्रच बदलले. मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणाहून नागरिक लातूर जिल्ह्यात येण्यास सुरुवात झाली़ जिल्ह्यातर्गत प्रवास सुरु झाला़ चेक नाक्यांवरील कामही शिथील झाले.
नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आणि पाहता पाहता लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली़ एकाच दिवसांत ५० ते ६० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडू लागली़ उपाययोजनांचा फारसा प्रभाव पडताना दिसून येईनासा झाला़ जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामूळे आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, अशी मागणी करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली़ एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता १५ ते ३० जूलै या कालावधीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला़ बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तिन्ही दिवशी लातूर शहर कडकडीत बंद राहिले़ दरम्यान पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहर पिंजून काढत पाहणी केली.
नागरिकांनीच ठरवल्याने यंत्रणेवरील ताण कमी
लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी करण्याचे लातूरकरांनीच ठरलेले असल्यामूळे गेल्या तीन दिवसांत नागरिक घराबाहेर पडलेले नाहीत़ मागणच्या लॉकडाऊनचा अनुभव असा नव्हता़ त्यामुळे पोलीस यंत्रणेवर खुप ताण पडला होता़ या लॉकडाऊनमध्ये मात्र कोणीच विनाकारण बाहेर पडत नसल्यामुळे यंत्रणेवरील ताण आपोआप कमी झाल्याचे दिसून येत आहे़
Read More मिनी मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव!