18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरहात न धुल्याने जगभरात दरवर्षी ३५ लाख मुले दगावतात

हात न धुल्याने जगभरात दरवर्षी ३५ लाख मुले दगावतात

एकमत ऑनलाईन

लातूर : जगभरात हात स्वच्छ न धुता अन्नग्रहण केल्यामुळे पोटामध्ये विविध जंतू जाऊन होणा-या आजारांमुळे दरवर्षी ३५ लाख मुले दगावतात, असे काही अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अतिशय सोप्या स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले. हात स्वच्छ असतील तर श्­वसनाचे विकार आणि पचनाचे विकार यांचे प्रमाण कमी होते. म्हणुन १५ ऑक्टोंबर रोजीच्या हात धुवा मोहीमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

यात ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांनी तर शाळेतील शिक्षक यांनी जास्तीत जास्त सोशल मिडियाचा वापर करून ऑनलाईन शिकवणीद्वारे, फेसबुक, वॉटसअ‍ॅप, रटर, आणि लेख लिहुन हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून घ्यावेत व मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करावी. या विषयाचे आदेश गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. कोरोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी एकच उपाय दिसत आहे तो म्हणजे हाता धुवा व ८० टक्के नेहमी होणा-या अनेक आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातांमध्ये असते.

अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते. म्हणूनच २००८ मध्ये स्टॉकहोम शहरात जागतिक पाणी सप्ताहाची परिषद भरली होती. तिथून हस्तशुद्धी मोहिमेचा श्रीगणेशा झाला. यात सामान्य जनतेचा सहभाग असण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक प्रबोधन आवश्यक आहे. त्यासाठीच १५ ऑक्टोबर हा जागतिक हस्तशुद्धी दिन म्हणून साजरा केला जातो. २००८ मध्ये तो पहिल्यांदा पाळण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाताच्या स्वच्छतेचे बीज रुजवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. कारण, लहान मुलांमध्ये मुळातच स्वच्छतेबाबत फारशी जागरुकता नसते. मातीतले खेळ, भटकणे, अस्वस्छतेची जाण नसणे यामुळे मुलांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याचे मूळ कारण म्हणजे मुले अन्न खाताना हात स्वच्छ धुवत नाहीत. त्यामुळेच बहुतांश शाळकरी मुलांमध्ये हगवणीसारखे पोटाचे विकार अधिक प्रमाणात होताना दिसतात. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली
गेली.

या मोहिमेत सर्व संरपच, ग्रामसेवक, तसेच शिक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे , मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, कृषी सभापती, गोंिवद चिलगुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, बालकल्याण सभापती ज्योती ताई राठोड, बांधकाम सभापती संगीताताई घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या