लातूर : प्रतिनिधी
२६ जुलै या दिवशी आपल्या देशाच्या इतिहासात घडलेल्या सर्वात मोठ्या घटनेचा दिवस म्हणजे कारगिल युद्ध. हा दिवस आपल्या देशात कारगिल विजय दिवस साजरा म्हणून करण्यात येतो तसेच कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित असलेला असा हा दिवस म्हणून शहरात हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जिल्हा क्रीडा संकुलातील शहीद युद्ध स्मारकापूढे सर्वजण नतमस्तक झाले. शहीद जवान अमर रहे…च्या घोषणेने सारा आसमंत दुमदुमुन गेला.
लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलातील शहीद युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ‘शहीद जवान अमर रहे…’, या घोषणेने सारा आसमंत दुमदूमून गेला. कारगिल युद्धात शहिद भारतीयांसाठी विजय दिवस आहे. भारतीय जवानांनी या युद्धात दाखवलेले शौर्य अद्वितीय आहे. शत्रु सैन्यासोबत निकराचा लढा देऊन भारत मातेच्या रक्षणासाठी असंख्या शुरविरांनी आपल्या प्राणांची आहूती दिली.
त्यांच्या प्रति तमाम भारतीय नतमस्तक आहेत. लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलातील शहीद युद्ध स्मारकस्थळी कार्यक्रम आयोजित करुन भारतीय शुरवीर शहीद जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी पक्षाच्या पदाधिका-यांसोबत कारगिल विजय दिनानिमित्त शहीद वीर जवानांना पुष्गुच्छ अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विजयकुमार साबदे, सुधीर पोतदार, प्रविण सूर्यवंशी, अॅड. देविदास बोरुळे पाटील, सचिन गंगावणे, रमेश सूर्यवंशी, अभिजीत इगे, अकबर माडजे, ज्ञानेश्वर सागावे, संजय सूर्यवंशी, पवन सोलंकर, ज्ञानोबा गवते, राहूल डूमणे, बालाजी झिपरे, विष्णूदास धायगुडे, पप्पू घोलप यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.