लातूर : जाणून घ्या उद्यापसून काय असणार बंद काय असणार सुरू
लातूर : उद्यापासून जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. आज लातूर शहरातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. असून पुन्हा लॉकडाऊन हा प्रकार नसणार आहे. मात्र त्यामुळे आपली जबाबदारी आणखी वाढणार आहे. उद्यापासून सर्व गोष्टी सुरूवात असताना अनावश्यक बाहेर पडण्याची गरज नाही. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व गोष्टी चालू असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.
प्रत्येकाने जबाबदारीने वागावे
उद्यापासून आपण पुन्हा नव्याने सुरूवात करणार आहोत. प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. दुकानांची सुरूवात करत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्स हे मात्र नक्कीच पाळावे लागणार आहे. यापुर्वी उघडलेले लॉकडाऊन आणी उद्या उघडणारे लॉकडाऊन यामध्ये मोठा फरक आहे. त्यावेळी कोरोना रुग्णांच्या केसेस फार कमी होत्या, आता मात्र त्या वाढलेल्या आहेत.
१७१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू
जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या परिस्थितीत २७३ अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह केसेस आहेत. २ हजार ९९९ एवढी रुग्ण यशस्वी उपचार घेऊन बरे होऊन घरी गेली आहेत. १७१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
उद्यापासून काय राहणार बंद
शाळा, कॉलेज, कोचिंक क्लासेस, जीम, स्विमिंग पुल, चित्रपटगृह, हॉटेल (पार्सलसेवा चालू राहणार), आठवडी बाजार, जनावारांचा बाजार, धार्मिक स्थळे, मंदिर, मस्जिद, बौद्धविहार, राजकिय व सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ हे सर्व बंद असणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्या संदर्भात
कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्या संदर्भात सूचना आल्या होत्या. या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात. या ठिकाणी त्यांच्या तपासणी करून घेण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले होते. त्या ठिकाणी तापसणी झाल्यानंतरच त्याचा वेगळा निर्णय घेण्यात येणार आहे.
बैलपोळा : घरीच हा सण साजरा करावा
बैलपाळा सणाला सार्वजनिक मिरवणूकीला परवाणगी मिळणार नाही. यावेळी शेतक-यांनी घरीच हा सण साजरा करावा.
गणेशमुर्ती स्टॉल व मिरवणूकीस परवाणगी नाही
सार्वजनिक गणोशोत्सव शक्यतो आपण टाळावा. पुर्वी मुर्ती विक्रीसाठी मैदानावर परवानगी देण्यात येत होती. यावर्षी ती परवाणगी देण्यात येणार नाही. मात्र मूर्ती वैयक्तीक दुकानात नियम पाळून विकता येईल. यावर्षी गणेशविसर्जनाची कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही. मूर्तीचे विसर्जन आपल्या घरीच करावे.
बससेवा सुरू राहणार
एसटी बस सेवा ही जिल्हाअंतर्गत सुरू असणार आहे. ५० टक्के या प्रमाणात त्या सुरू राहतील.
हेल्मेट बंधनकारक
दुचाकीस्वारांना पोलिस पकडून दंड वसूल करतात या तक्रारीवर जिल्हाधिकारी म्हणाले की, हेल्मेट घालून वाहन चालवणे हा नियमच आहे. मास्क आणि हेल्मेट घातले असेल तर कोणतीही कार्यवाही होणार नाही.
सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील