24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूरमंडळाच्या मुख्यालयातच उमेदवारांना परीक्षा केंद्र

मंडळाच्या मुख्यालयातच उमेदवारांना परीक्षा केंद्र

एकमत ऑनलाईन

लातूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवाअंतर्गत गट ‘क’ पदभरती संदर्भात होत असलेल्या वेगवेगळ्या चर्चेसंदर्भात आरोग्य सेवेच्या लातूर मंडळाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी शुक्रवाी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वस्तूस्थिती नमुद करताना उमेदवारास परीक्षा केंद्र देताना उमेदवाराने ज्या मंडळातील रिक्त पदासाठी अर्ज केलेला आहे त्या मंडळाच्या मुख्यालयात त्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.

एखाद्या उमेदवाराने लातूर मंडळातील सकाळच्या सत्रात परीक्षा होणा-या रिक्त पदासाठी अर्ज केलेला अ‍ेस तर सदर उमेदवारास लातूर शहरातील परीक्षा केंद्रावर आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे व त्याच उमेदवारानेक नाशिक मंडळातील दुपारच्या सत्रात होणा-या इतर संवर्गातील रिक्त पदासाठी अर्ज केलेला असेल तर नाशिक शहरातील परीक्षा केंद्रावर आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजेच उमेदवार ज्या मंडळात नोकरी करु इच्छित आहे त्याच मंडळातील परीक्षा केंद्रावर त्याने परीक्षा देणेय अपेक्षीत आहे.

ही अट ठेवली नाही तर कोणत्याही भागातील उमेदवार आपल्या गावी बसून राज्यातील इतर कोणत्याही भागासाठी अर्ज करतील आणि निवड झाल्यानंतर एक तर हजर होणार नाहीत किंवा हजर होऊन काम करणार नाहीत किंवा पहिल्या दिवसापासून बदली मागतील, याचा सर्वाधिक दुष्परिणाम आदिवासी, दुर्गम भागातील आरोग्य सेवेवर होईल. विशेष म्हणजे आरोग्य विभागात २१ संवर्ग आहेत. त्यामुळे संवर्गनिहाय परीक्षा घेतली तर एक वर्षही पुरणार नाही. त्यामुळे उमेदवार ज्या पदाच्या परीक्षेसाठी बसतील त्या पदाच्या नेमणुकीसाठी त्याचा विचार करण्यात येईल, अशी पद्धत अवलंबिण्यात आली आहे. यापुर्वी सन २०१६ व २०२१ मध्ये झालेल्या परीक्षांसाठी हीच पद्धत अवलंबिण्यात आलेली आहे.

गट ‘क’ संवर्गाच्या परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीमध्ये अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये व वेळोवेळी नोटिफि केशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी उपरोक्त बाब लक्षात घेऊन अर्ज करणे अभिपे्रेत आहे. परंतू, काही उमेदवारांनी एक किंवा अनेक पदांसाठी वेगवेगळ्या नेमणुका अधिका-यांकडे, कार्यालयांकडे अर्ज केले आहेत. उदाहरणार्थ एका उमेद वाराने वाहनचालक पदासाठी उपसंचालक, पुणे, नाशिक, अकोला येथे आणि सहसंचालक पुणे येथे अर्ज केला आहे. त्या उमेदवारास सर्व मंडळामध्ये परीक्षा देण्याची सोय करावयाची झाल्यास वाहनचालकाच्या प्रत्यक मंडळ आणि सहसंचालक कार्यालयाच्या परीक्षा वेगवेगळ्या १४ रविवारी घ्याव्या लागतील. हीच बाब लक्षात घेऊन २१ संवार्गाची परीक्षा घ्यावयाची झाल्यास जवळपास १ ते दीड वर्षांचा कालावधी लागेल.

उमेदवारांना सोयीचे व्हावे, यासाठी यातील पहिल्या सत्रात पदवी ते १२ वी शिक्षण आवश्यक असणारे व दुस-या सत्रात पदवी व पदयुत्तर शिक्षण आवश्यक असणारे संवर्ग समाविष्ट करण्यात आलेले आहेत. लातूर परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात लातूर, नांदेड, बीड व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. सदरील भरती परीक्षा लातूर शहरातील केंद्रावर होणार आहे. सकाळच्या सत्रासाठी ४ हजार २४३ उमेदवार असून त्यासाठी ६ केंद्रांवर १० ते दुपारी १२ यावेळेत परीक्षा घेतली जाणार आहे. दुपारच्या सत्रासाठी १४ हजार ९०३ उमेदवार असून त्यासाठी ३५ केंद्रांवर दुपारी ३ ते ५ यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. लातूर मंंडळातील एकुण १९ संवर्गासाठी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. या मंडळाअंतर्गत घेण्यात येणा-या संवार्गातील कर्मचा-यांचे नियुक्ती अधिकार उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर मंडळ हे आहेत, असेही डॉ. माले म्हणाले. या पत्रकार परिषदेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख व डॉ. ढगे यांची उपस्थिती होती.

९ हजार उमेदवारांना फी न घेता प्रवेशपत्र दिले
माजी सैनिकांना अर्ज भरण्यासाठी फी नसल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील रिक्त पदांसाठी माजी सैनिकांसाठी राखीव आरक्षणातून अर्ज केलेल्या सुमारे ९ हजार माजी सैनिकांना फी न घेता प्रवेशपत्र देण्यात आलेले आहेत. फोटो व सही अस्पष्ट असल्यामुळे अ‍ॅडमिट कार्ड मिळत नाही, अशी एक तक्रार होती परंतू, अशा उमेदवारांना मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांना संपर्क साधण्यास कळविले आहे, त्यांना ओळख तपासणून प्रवेशपत्र दिले जात आहे, असेही डॉ. एकनाथ माले म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या