जळकोट : जळकोट तालुक्यांमध्ये सप्टेबर तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड अशा प्रमाणात नुकसान झाले होते,. जळकोट तालुक्यातील शेतक-यांनी तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी शेतक-यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली होती. या नंतर प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले, पंचनामे करून रीतसर अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यामुळे जळकोट तालुक्यातील सर्व शेतक-यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा होती परंतु आता जळकोट तालुक्यातील शेतक-याना केवळ शासनाकडून सात कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. या निधीतून चाळीस टक्के शेतक-यांनही मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जळकोट तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे सोयांिबचे ८५० हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे १०८१ हेक्टर क्षेत्र, तुरीचे ३२९२ हेक्टर क्षेत्र, ज्वारीचे १४२८ हेक्टर क्षेत्र, असेच १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते, तसा अहवाल जळकोट प्रशासनाच्यावतीने शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांना लवकर नुकसान भरपाई मिळेल तसेच अधिकची नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा आता फोल ठरताना दिसून येत आहे. जळकोट तालुक्यात पेरणी चे क्षेत्र २८ हजार हेक्टर एवढे आहे परंतु शासनाकडून मदत मात्र १४ हजार एकर क्षेत्रावरील पिकांना मिळणार आहे आणि या मधील फक्त सात कोटी रुपये जळकोट तालुक्यासाठी सरकारने उपलब्ध करून दिले आहेत, यामुळे एकतर तालुक्यातील अर्ध्या गावांना मदत मिळणारकिंवा अर्ध्या शेतक-यांंना मदत मिळणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
जळकोट तालुक्यात पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे याचा थेट फटका उत्पन्नावर बसला आहे,उडीद आणि मूग या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु या पिकांचा नुकसानभरपाई मध्ये समावेश करण्यात आला नाही, तसेच लवकर तालुक्यात सोयाबीनचे १९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. सोयाबीनचेही अतिपावसामुळे खूप नुकसान झाले आहे. सर्वसाधारण एका बॅगला आठ ते दहाकिं्वटल सोयाबीन होणे अपेक्षित असते. परंतु जवळ तालुक्यात प्रति बॅग केवळ तीन ते चारकिं्वटल सोयाबीन उतार देत आहे. यामुळे शेतक-यांना सोयाबीनवर केलेला खर्चही मिळेनासा झाला आहे, अशीच अवस्था कापूस या पिकाची झाली आहे. कापसाचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी निघत आहे यामुळे शेतक-यांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी वांजरवाडा येथील पिकांची पाहणी केली होती तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानीही जळकोट तालुक्यात धावता दौरा केला होता, यामुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांना हेक्टरी दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल व जेवढे नुकसान झाले आहे तेवढे नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आज घडीला शासनाकडून पहिल्या टप्प्यात केवळ सात कोटी रुपयांची मदत आली आहे. या सात कोटीवर शेतक-यांची दिवाळी गोड होईल का असा सवालही आता व्यक्त केला जात आहे.
सरकारकडून तुटपुंजी मदत
जळकोट तालुक्यातील शेतक-यांची सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक काळवंडले होते, तर कापूस पिकांची बोंडे गळून गेली होती, मूग आणि उडीद तर शेतक-यांनी घरला आणलेच नव्हते, यावर्षी शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. शेतक-याना हेक्टरी कमीत कमी पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते परंतु आता एकरी दहा हजार रुपये मिळतात की नाही याचीही खात्री नाही आणि जी मदत मिळाली आहे हे ती सरसकट पिकांना नाही.
-बाळासाहेब शिवशेट्टे
(मनसे तालुकाध्यक्ष जळकोट)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020; छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध