22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टी

लातूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टी

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात गेली दोन-तीन दिवस दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या दृष्टीने हा पाऊस लाभकारी ठरला असला तरी खरीप पिकांची मात्र दाणादाण झालेली आहे. दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यातील ६० महसूल मंडळापैकी अहमदपूर महसूल मंडळातील सर्वाधिक पाच गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. देवणी व जळकोटलाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

यंदाच्या पावसाळ्याची आतापर्यंतची स्थिती पाहिली तर एकंदरीत पावसाळा लहरीच दिसून येत आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहते. हा नेहमीचा अनुभव आहे. मात्र यंदा जो काही पाऊस पडला तो समसमान नव्हताच. कुठे कमी तर कुठे अधिक पाऊस पडला. त्यामुळे एकीकडे पाणी, पाणी तर
दुसरीकडे पावसाची गरज असे चित्र राहिले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानूसार शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार असे चार दिवस सलग पाऊस झाला. या पावसाचीही त-हा काही वेगळीच होती. रविवारी जिल्ह्यातील हरंगुळ, कासार बालकुंदा, वडवळ, झरी, रेणापूर, पोहरेगाव, कारेपूर, पळशी, देवणी व वलांडी परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेत-शिवारांत तळे साचले आहेत. सोमवारी व मंगळवारीही पावसाची हजेरी होतीच. बुधवारी सकाळपर्यंत अहमदपूर महसूल मंडळातील हाडोळती, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, देवणी व जळकोट या सात ठिकाणी अतिवृष्टी झाली.

या पावसाने जिल्ह्यातील मांजरा व निम्न तेरणा हे दोन मोठे, तावरजा, मसलगा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ व घरणी हे आठ मध्यम व १३२ लघू प्रकल्प असे एकुण १४२ प्रकल्पांतील पाण्याची पातळी वाढली. ही समाधानाची बाब बसली तरी या पावसाने ऊस पिकासह खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणचा ऊस आडवा झाला आहे. सोयाबीनसह उडीद, मुग आदी पिकांची नासाडी होत आहे. शेत-शिवारांनी पावसाचे पाणी थांबल्याने तळयाचे स्वरुप आले आहे. पिकं पाण्यात आहेत. हा पाऊस शेतक-यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरण्याऐवजी नूकसानकारी ठरला आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ९८.१ मी. मी. पाऊस
बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ९८.१ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. लातूर तालुक्यात २३.८, औसा-२६.०, निलंगा-१७.०, उदगीर-३२.०, चाकुर-२९.५, रेणापूर-३९.३, देवणी-५४.९, शिरुर अनंपाळ-२९.१, जळकोट-४८.० मी. मी., एकुण ३६. ० मी. मी. पावसाची नोंद झालेली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या