22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरचाकूर येथे महाराष्ट्र महोत्सव उत्साहात

चाकूर येथे महाराष्ट्र महोत्सव उत्साहात

एकमत ऑनलाईन

चाकूर : कोरोना या जागतिक महामारीमुळे मागील दोन वर्षांंपासून चाकूर शहरासह तालुक्यात कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम झाला नाही. नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संयोजन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र महोत्सवास’ विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. या ऑफ लाईन कार्यक्रमाचे ऑन लाईन प्रेक्षपण विविध माध्यमांच्या सहकार्याने करण्यात आल्यामुळे या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद अनेकांना घेता आला.
नगराध्यक्ष कपिल माकणे वाढदिवस गौरव समितीच्या वतीने नगराध्यक्ष महोत्सवांतर्गत शिवदर्शन सांस्कृतिक मंच मुंबई प्रस्तुत महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन शनिवारी (दि.२८) सायंकाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते. यात डॉ.गणेश चंदनशिवे आणि सहका-यांनी गोंधळ, योगेश चिकटगावकर आणि सहका-यांनी भारुड, शिवशाहीर यशवंत सुरेश जाधव आणि सहका-यांनी पोवाडा तर लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकरसह रेश्मा परिनेकर आणि पार्टीच्या वतीने लावण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांच व गुडीपाडव्यानिमत्ति घेण्यात आलेल्या स्पर्धांच बक्षीस वितरण करण्यात आले.

महोतस्वास मान्यवरांची उपस्थिती
जीएसटी कमिशनर जी.श्रीकांत, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरके, सरपंच तथा चेअरमन डॉ.गोंिवंदराव माकणे, नगराध्यक्ष कपिल माकणे, सौ.दुर्वा कपिल माकणे, तालूका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राधाकिशन तेलंग, नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, नगरसेविका हिरकणा लाटे, व्यंकटेश धोंडगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर,माजी नगराध्यक्ष मिंिलंद महांिलंगे, ज्ञानेश्वर चाकूरकर, माजी उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद, माजी उपसरपंच गणेश फुलारी, सागर होळदांडगे, सिनेट सदस्य युवराज पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, धनंजय नाकाडे, शिवसेना तालुका प्रमुख गुणवंत पाटील, रिपाई तालुकाध्यक्ष पपन कांबळे, गौरीशंकर शेटे, नारायण बेजगमवार,प्रा.राजेश तगडपल्लेवार,जगन्नाथ मिरकले, विलास सूर्यवंशी, सुरज शेटे, मंगेश स्वामी, योगेश सोनटक्के, संचालक अजय नाकाडे,यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या