29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूर१५०० मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात

१५०० मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात उत्पादित होणा-या द्राक्षाची विदेशात निर्यात करण्यासाठी पाच तालुक्यातून ११० शेतक-यांनी आपेडाकडे नोंदणी केली होती. यावर्षी मार्च अखेर पासून आज पर्यंत द्राक्ष बागायत दारांनी १ हजार ४७० मेट्रीक टन द्राक्षांची युरोपीयन देशात निर्यात केली आहे. या द्राक्षांना ७० ते ९० रूपये दर मिळाला आहे. सदर दाक्षांची एप्रिल अखेर पर्यंत द्राक्षांची निर्यात होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना द्राक्ष उत्पादक शेतक-यांना लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी द्राक्षांची वेळेत निर्यात करता आली नाही. तसेच द्राक्षांचे घडही ठराविक वेळेपेक्षा जास्त दिवस झाडावर राहीले. त्यामुळे एप्रिल-मे मध्ये द्राक्ष बागांची छाटनी वेळेवर होणे आपेक्षीत होती ती झाली नाही. त्यामुळे जूनला तयार होणा-या काडीमालावर त्याचा परिणाम झाला. तसेच गेल्यावर्षी पावसाळाही वेळेवर सुरू झाल्याने त्याचा फटकाही बागांना बसला. ऑक्टोबर मध्ये बागांची छाटनी झाल्यानंतर १० ते १५ दिवसात फळ लागवड सुरू झाली. जास्त दिवस झाडावर द्राक्षांचे घड राहील्याने १० ते २० टक्के उत्पादनात यावर्षी घट दिसून येत आहे.

द्राक्ष निर्यातीसाठी लातूर जिल्हयातील ११० शेतक-यांनी अपेडा या कंपनीकडे नोंदणी केली आहे. यात औसा तालुक्यात ९१ शेतकरी, लातूर तालुक्यातून ५ शेतकरी, चाकूर तालुक्यातून १ शेतकरी, निलंगा तालुक्यात ९ शेतकरी, तर उदगीर तालुक्यातून ४ शेतक-यांनी नोंदणी केली होती. या शेतक-यांनी पॅनासिया अग्रो एक्सपोर्टकडे ६५० मेट्रीक टन, इरो फू्रटकडे २४० मेट्रीक टन, सहयाद्री अ‍ॅग्रो एक्सपोर्ट ३८० मेट्रीक टन, फ्रेश स्टॉक अग्रो एक्सपोर्ट मार्फत २१० मेट्रीक टन द्राक्षांची युरोपातील देशांना निर्यात करण्यात आली.

द्राक्षांच्या उत्पादनात १० ते २० टक्के घट
द्राक्ष बागांची बदलत्या वातावरणानुसार सतत फवारण्या कराव्या लागतात. त्यामुळे द्राक्षांची शेती ही अनिश्चिततेची शेती आहे. गेल्यावर्षी पावसाळयात शेततळे भरून घेतल्याने त्या पाण्याचा ठिबक द्वारे बागांना वापरता येते. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे द्राक्ष बागांना वेळेपेक्षा जास्त दिवस द्राक्षांचे घड तोडणी राहिले. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या छाटणीवर व १० ते २० टक्के द्राक्ष्यांच्या फळ लागवडीवर परीणाम झाला. तसेच यावर्षी द्राक्षांना ८० ते ८५ रूपये किलो ठोक बाजारात दर मिळाला, अशी माहिती औसा तालुक्यातील किल्लारी येथील सिताराम जाधव यांनी दिली.

शेतक-यांना शेततळे देण्यासाठी मदत करू
लातूर जिल्हयातून द्राक्ष निर्यातीसाठी चांगला वाव आहे. द्राक्ष बागा जोपासण्यासाठी शेतक-यांना मोठया प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ती गरज शेततळयाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. द्राक्ष उत्पादनासाठी पुढाकार घेणा-या शेतक-यांसाठी पोकरा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना मार्फत शेतक-यांना शेततळे देण्यासाठी सहकार्य करू. तसेच लातूर जिल्हयातून चांगल्या दर्जाचे द्राक्ष उत्पादनासाठी व निर्यातीसाठी कृषि विभागाकडून कार्याशाळा व अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्र्य गावसाने यांनी दिली

क्रीमसनला मिळाला सर्वाधिक दर
लातूर जिल्ह्यातून युरोपीयन देशांना १ हजार ४७० मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली. यात क्रीमसन द्राक्षांना ८० ते ९० रूपये सर्वाधिक दर मिळाला. २ ए क्लोन द्राक्षांना ७० ते ८० रूपये दर मिळाला. मानिक चमनलाही ७० ते ८० रूपये किलो प्रमाणे दर मिळाला. तर गेल्यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने शेतक-यांना ९० ते १०० रूपये किलोच्या दराने विक्री होणारे द्राक्ष ५० रूपये किलो दराने विक्री करावे लागले. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागला.

लातूरात लवकरच सर्वसोयीनियुक्त जम्बो कोवीड केअर सेंटर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या