30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूर‘आरटीई’ च्या मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ

‘आरटीई’ च्या मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

आजपर्यंत ५५.३८ टक्के बालकांचे मोफत प्रवेश; ११२६ विद्यार्थ्यांचा झाला प्रवेश

लातूर : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठीची प्रक्रिया दि. २४ जून पासून सुरू झाली होती. मोफत शिक्षणाच्या प्रवेशासाठी दि. ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजपर्यंत पहिलीच्या वर्गासाठी १ हजार १२६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळाला आहे. सदर प्रवेश हे एकूण प्रवेशाच्या ५५.३८ टक्के झाले आहेत. उर्वरीत प्रवेशासाठी शिक्षण विभागाने दि. १५ सप्टेंबर पर्यंत मोफत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २३५ कायम विना अनुदानीत इंग्लीश स्कूल, मराठी माध्यम, स्वयं अर्थसहित शाळामध्ये पहिलीच्या वर्गासाठी २ हजार १३० बालकांना २५ टक्के मोफत प्रवेशाच्या जागा आहेत. त्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पालकांच्याकडून दि. ११ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवले होते. जिल्ह्यातून इयत्ता पहिलीच्या मोफत प्रवेशासाठी ५ हजार २१४ पालकांनी अर्ज केले होते. राज्यस्तरावरून काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये २ हजार ३३ विद्यार्थ्याची इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी निवड झाली होती.

जिल्ह्यातील २३५ खाजगी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या १९२ शाळा, तर मराठी माध्यमाच्या ४२ शाळा आहेत. या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वंचित व दुर्बल घटकांसाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रीया राबवण्यात येत आहे. पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश घेणा-या बालकांना इयत्ता ८ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे.

प्रवेश पात्र पालकांनी आपल्या पाल्याचे सर्व कागदपत्रे शाळा स्तरावर दाखल केले शाळांनीही जमा झालेले विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे त्या-त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या पाडताळणी समितीकडे दाखल केले. पंचायत समितीच्या पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी होऊन १ हजार १२६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. इयत्ता पहिलीच्या मोफत प्रवेशासाठी आजपर्यंत ५५.३८ टक्के प्रवेश झाले आहेत. उर्वरीत ९०५ प्रवेश अद्याप झाले नाहीत. तसेच देवणी तालुक्यातील दोन पालकांना शिक्षण विभागाने कळवूनही त्यांनी प्रवेश घेतला नाही.

प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ
आरटीई प्रवेश प्रक्रिया करिता २०२०-२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी दि. ३१ ऑगस्ट पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा अशा सूचना होत्या. कोरोना विषाणूमुळे कांही पालक गावकडे होते. तर कांही पालकांचा संपर्क झाला नव्हता. दि. ३० ऑगस्ट रोजी शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीच्या मोफत प्रवेशासाठी दि. १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश घेता आले नाहीत, अशा पालकांना प्रवेश घेण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.

लातूर तालुक्यात सर्वाधिक प्रवेश
आरटीई प्रवेश प्रक्रियेतंर्गत आजपर्यंत १ हजार १२६ प्रवेश झाले असून सर्वाधिक प्रवेश लातूर तालुक्यात ५८९ प्रवेश झाले आहेत. त्या खालोखाल उदगीर तालुक्यात १४९ प्रवेश झाले आहेत. निलंगा तालुक्यात १३४, औसा तालुक्यात ८२, अहमदपूर तालुक्यात ७०, चाकूर तालुक्यात ४०, देवणी तालुक्यात ३२, रेणापूर तालुक्यात १९, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ८, तर जळकोट तालुक्यात ३ प्रवेश झाले आहेत.

प्रशासनाच्या निर्देशानुसार विर्सजनही गर्दी टाळत शांततेत करावे : पालकमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या