लातूर : लातूर जिल्ह्यात आज पॉजिटिव्हीटी रेट दररोज कमी होत आहे. हळूहळू लॉकडाऊनचा फायदा आता होऊ लागला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये आपण मोठ्या प्रमाणात तपासणी करणार असून त्यामुळे आपण लवकरच कोरानामुक्तीकडे वाटचाल करू लागलो आहे यात शंकाच नाही मात्र काळजी घेणे आवश्यक असल्याच मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. ते लातूर जिल्ह्यातील जनतेशी १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर संवाद साधत होते.
हॉटस्पॉट झोनमध्ये आपण तपसणी करणार
यावेळी ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या रॅपिड अॅँटिजन टेस्ट प्राधान्यांने कराव्यात अशी मागणी असल्याच्या पश्नावर ते म्हणाले की, १३, १४, १५, १६ या काळात आपण टेस्ट करत आहोत. कंटेन्मेंट झोनमध्ये आपण मोठ्या प्रमाणात तपासणी करणार आहेत. त्यावर प्राधान्याने आमचा भर असणार आहे. काही ठिकाणी हे टेस्टींग सेंटर उपलब्ध असणार आहेत. एखाद्या कंटेन्मेंट झोनमध्ये, गल्लीमध्ये, प्रत्येक घरामध्ये, चारपाच घरामध्ये जास्त केसेस निघत असतील तर या हॉटस्पॉट झोनमध्ये आपण तपसणी करणार आहोत. व्यापा-यांनी अनावश्यक गर्दी करू नये. गेली दोन दिवस आपण कुणालाही दंडात्मक कारवाई केलेली नाही. मात्र नागरिकांनुी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असतील तर तात्काळ सांगावे, लक्षणे दिसलीत तर लगेच तपासणी करावी. आजार अंगावर काढू नये.
१५ ऑगस्टचा कार्यक्रम : फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून लातूरकरांना अनुभवता येणार सोहळा
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, उद्या मा. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यासह निमंत्रीत व्यक्तींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्टचा कार्यक्रम होणार आहे. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हा सोहळा लातूरकरांना अनुभवता येणार आहे. नागरिकांनी येथे गर्दी करू नये. देशासाठी मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींना घरी जाऊन पालकमंत्र्यांचे पत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
सर्वांची तपासणी करणे शक्य नाही
कोरोना रुग्णांसंदर्भात पॅटर्न लक्षात घेतला जात आहे. नेमक्या केसेस कुठून येत आहेत त्याचा शोध घेतला जात आहे सर्वांची तपासणी करणे शक्य नाही. लातूर जिल्ह्याची लोकसंख्ये प्रमाणे विचार केला तर आणखी दोन वर्ष आपल्या टेस्ट चालतील. म्हणूनच सरसकट टेस्ट करण्यापेक्षा ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले त्यांच्या संपर्कात आलेले किंवा आणखी परिसरातील लोकांची टेस्ट करणे योग्य राहिल. आमची टिम त्या संदर्भात विचार करत आहे. पालकमंत्री मा. अमित विलासराव देशमुख यांच्यासह आणखी आमच्या टीममधील आरोग्य एक्सपर्ट यांचा विचार घेऊन आम्ही या संदर्भात निर्णय घेऊ.
भीती अजीबात बाळगू नये
नागरिकांनी उद्याचा सोहळा उत्साहास साजरा करावा. कोणत्याही प्रकारे मनात शंका ठेऊ नये. भिती बाळगू नये. झेंड्याचा अपमान होईल असे कृत्य करू नये. आपल्या घरावर, फ्लॅटमध्ये, बालकनीमध्ये आपण सन्मानपूर्वक झेंडा वंदन करू शकता. मात्र प्लास्टिकचा झेंडा वापरू नये.
तुम्ही विचारलेल्या प्रश्नामुळे एखाद्याचा जीव वाचवू शकता
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी औषधी दुकानदारांना सूचना केली आहे की त्यांच्याकडे कोणी पॅरासिटीमॉल किंवा सर्दी, खोकला यांच्या औषधी घेण्यासाठी आला तर त्यांना विचारा घरात कुणाला ताप आहे का असे विचारून घरात त्यांची कोरोना चाचणी करून घ्या अशा सूचना नक्कीच करा. डॉक्टरांच्या प्रिसिक्शनशिवाय औषधीअसेल नसेल तरी त्यांना या गोष्टी सांगा. कारण याच ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. ताप आहे दोन दिवसात बरे होईल असे प्रत्येकाला वाटते मात्र आजार अंगावर काढल्यानंतर लोक रुग्णालयात येतात तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून समोरच्यांना असा प्रश्न नक्कीच विचार कदाचीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो.
सर्वांचं लागलं होत लक्ष : राजस्थानात गहलोत सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला