27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरबनावट सोने विकणारी टोळी जेरबंद

बनावट सोने विकणारी टोळी जेरबंद

एकमत ऑनलाईन

चाकूर : बनावट सोने खरे असल्याचे भासवून फसवणूक करणा-या टोळीला जेरबंद करुन या प्रकरणात सहा आरोपीना चाकूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी टोळीकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दि २५ ऑगस्ट २०२२ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे एका तक्रारदाराने माहिती दिली की, काही महिला व पुरुष त्याला कमी दरात दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते लोक माझी फसवणूक करतील याबद्दल मला संशय निर्माण झाला असून सदरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार दि. २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती दिली.

या माहितीवरुन सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी चाकूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून सापळा रचून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोन्याची देवाणघेवाण होत असताना आढळून आले. यावेळी पोलिसांचा संशय बळावल्याने सदरच्या टोळीतील सदस्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूला दबा देऊन बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्याच्या जवळ असणा-या पिशवीची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिवळ्या धातूचे दागिने सापडले. पोलिसांनी टोळीतील सदस्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आम्हाला पैशाची गरज असल्याने आम्ही हे सोने कमी किमतीत विकायचे आहे, असे सांगत ग्राहकाला खोटे सोने विकणार होतो. अशी कबुली दिली.

या प्रकरणी जया दीपक शिंदे, वय ३५ वर्ष, राहणार विठ्ठल नगर, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद, शीला तपास भोसले, वय ३७ वर्ष, राहणार विठ्ठल नगर, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद., शुक्सला समाधान काळे, वय ३९ वर्ष, राहणार मोतीहरा तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. राम मारुती कोकरे, वय २६ वर्ष, राहणार कोरेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. सुरज समाधान काळे, वय २१ वर्ष, राहणार कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. व सुनील सिताराम भोसले वय ६१ वर्ष राहणार मोतीझरा गल्ली, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे दि २६ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०७/२०२२, कलम ४२०,५११,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील बनावट सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास चाकूर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व त्यांच्या पथकातील पोलिसांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या