22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरलवकर येण्याचे साकडे घालित बाप्पाला निरोप

लवकर येण्याचे साकडे घालित बाप्पाला निरोप

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या गणेशोत्सवातील दहा दिवसांत लातूर शहरात उत्साहाचे वातावरण होते. दहा दिवसांनंतर गणरायाला भक्तांनी पुढच्या वर्षी लवकरण येण्याचे प्रेमाचे साकडे घालीत लाडक्या गणरायाला स्नेहपूर्ण निरोप दिला. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव चैतन्यमय वातावरणात पार पडला. लातूर शहराच्या परंपरेनूसार विसर्जनाचा पहिला मान असलेल्या शहरातील आझाद चौकातील भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाच्या आजोबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील इतर मंडळांच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. आजोबा गणपतीचे विसर्जन रात्री ९.१५ वाजता तर विजसर्जनाचा शेवटचा मान असलेल्या औसा हनुमान दक्षिणेश्वर गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन पहाटे २.४५ वाजता झाले. विसर्जन मिरवणुकांमध्ये गुलालाऐवजी फु लांची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली. लातूरच्या उज्ज्वल ऐतिहासीक परंपरेनूसार गणरायाचे विसर्जन शांततामय वातावरणात उत्साहात पार पडले.

महानगरपालिका व प्रशासनाच्या वतीने शहरातील चारही दिशांना गणपतीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच गणरायाचे विसर्जन न करता मुर्तींचे दान करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्यासाठी शहरात विविध १३ ठिकाणी मुर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. आझाद चौक, औसा हनुमान, महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, मेन रोड, गंजगोलाई, भूसार लाईन, सुभाष चौक, दयाराम रोड, खडक हनुमान चौक, पटेल चौक, सिद्धेश्वर चौक ते सिद्धेश्वर मंदीर तीर्थकुंड या विसर्जन मिरवणुक मार्गावर या भागातील विविध गणेश मंडळांच्या ‘श्री’चे विसर्जन झाले तर छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोडवरही त्या त्या भागातील गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडले. लातूरचा महाराजा, लातूरचा राजा, एकता गणेश मंडळांचे ढोल पथक व आकर्षक विद्युत रोषणाईचा उत्साह सर्वाचे लक्षवेधून घेणारा ठरला.

शहरातील अमर गणेश मंडळ, बाप्पा गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळ, औसा हनुमान दक्षिणेश्वर गणेश मंडळासह अनेक गणेश मंडळांनी लक्षवेधी सजीव देखावे सादर केले. बाप्पा गणेश मंडळाचा आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देशाखावा लक्षवेधी होता. याशिवाय देशभक्ती, ऐतिहासीक, भारतीय सण आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे देखावे लक्षवेधी ठरले. शहरातील विविध सामाजिक संस्था, मित्र मंडळांनी मिरवणुक मार्गावर मंच उभारुन गणेश मंडळांचे स्वागत केले. काही संस्थांनी प्रसाद व पिणयाच्या पाण्याची सोय केली होती. छत्रपती शिवाजी चौक, औसा रोडवरील नंदी स्टॉप, आदर्श कॉलनी, बार्शी रोड व अंबाजोगाई रोडवरही स्वागत मंच उभारण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकांत वरुणराजानेही हजेरी लावल्याने उत्साहात अधिक भर पडली. पोली बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या