भेटा : श्रीधर माने
शेतकरी नवनवीन पिकांची पेरणी करुन फेरपालट करीत आहेत. पिकांना वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यामुळे पिके घेताना ती वेगवेगळ्या प्रकारची लावली तर जमिनीतील सर्व अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर करू शकतो. यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. आता शत्ोक-यांनी राजमाचा पर्याय शोधला आहे. वास्तविक पाहता राजमा हे पिक उत्तर भारतात घेतले जाते. सद्यस्थिती पाहता रब्बी हंगामात हरभरा प्रमुख पीक असते.
अलीकडे या पिकामध्ये मरीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी इतर पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत. त्याचाच परिणाम यंदा करडई, हरभरा पिकांची जागा राजमा ने घेतली आहे. परिसरातील भेटा, बोरगाव, अंदोरा भादा आदी गावामध्ये राजमा पिक घेतले जात आहे. खरिपातील उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी पिकाच्या काढणीनंतर राजमाची पेरणी केली आहे. मावा, तुडतुडे, बुरशीचा प्रादुर्भाव वगळता फारशी कीड या पिकावर येत नाही असे म्हटले आहे.प्रतिकिं्वटलला पाच हजाराच्या पुढेच आजवर दर असतो. म्हणून आम्ही हे पिक घेतले आहे. यावर्षी यशस्वी झाल्यानंतर पुढच्या वर्षी क्षेत्र वाढविणार आहे, असल्याचे शेतकरी युवराज साळुंके बोरगाव (न). यांनी सांगितले.