22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

एकमत ऑनलाईन

देवणी : तालुक्यातील सिमावर्ती भागातील कोरोवाडी शेतशिवारात ऊसाला पाणी देणा-या शेतक-यावर अचानकपणे बिबट्याने हल्ला करून जखमी केले. जखमी शेतक-यावर वलांडी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. ही घटना मंगळवारी दि.२६ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली

कोरेवाडी येथील शेतकरी दत्ता माधव अर्जुने हे आपल्या शेतातील ऊसाला पाणी देत असताना ऊस पिकात अचानकणे समोर बिबट्या आला. आणि त्याने शेतक-याच्या अंगावर झेप घेतली .शेतक-यानी त्याची झेप चुकवण्याचा प्रयत्न केला तरीही बिबट्याचा पंजा शेतक-याच्या कमरेच्या भागावर बसल्याने कमरेला गंभीर दुखापत झाली. मांडीवर वाघनख्याने ओरखडले आहे. भयभीत झालेल्या शेतक-याने शेतातच असलेल्या घराकडे धाव घेऊन घटनेची माहिती घरच्यानां दिली. त्याच्यावर वलांडी येथे प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी लातुरला पाठविण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेमुळे शेतक-यात भितीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीला रात्रीपाळीची वीज असल्याने अनेक शेतकरी पाणी देण्यासाठी शेतात असतात.दिवसाच वाघाने हल्ला केल्याने रात्रीचे काय? अशी भिती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे.

तहसीलदार घोळवे यांनी दिला सतर्कतेचा इशारा
कोरेवाडी शिवारात वाघसदृश प्राणी आढळून आला आहे व तसेच एका शेतक-यावर हल्ला केला आहे. तेव्हा देवणी तालुक्यातील नागरिकानी खबरदारी बाळगावी जेणेकरून कसल्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देवणी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले आहेc

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या