26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरशेतक-यांनी जिल्हा बँकेत भरला ८ कोटीचा पीकविमा

शेतक-यांनी जिल्हा बँकेत भरला ८ कोटीचा पीकविमा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पंतप्रधान खरीप पीक विमा २०२२ अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १११ शाखेतून पिक विमा भरणा सुरू असून शेतक-यांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक अधिकारी कर्मचारी आगाऊ शाखेवर पाठवण्यात आले असून २६ जुलै अखेर सायंकाळी पर्यंत ६९ हजार ५८८ शेतक-यांनी ७ कोटी ८२ लाख ४१ हजार रुपयाचा पिक विमा भरणा जिल्हा बँकेच्या जिल्ह्यातील शाखेत केला आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील ५ हजार १३७ शेतक-यांनी ६३ लाख ९२ हजार, रेणापूर तालुका ३ हजार ३२२ शेतक-यांनी ३७ लाख ९३ हजार रुपये, औसा तालुका ७ हजार ०४८ शेतक-यांनी ७५ लाख ३० हजार, निलंगा तालुका ९ हजार ९६७ शेतक-यांनी १ कोटी ६ लाख ६१ हजार रुपये, चाकुर तालुका ११ हजार ५९९ शेतक-यांनी १ कोटी १० लाख ५० हजार, अहमदपूर तालुका ३ हजार ५९३ शेतक-यांनी ४५ लाख ७१ हजार, उदगीर तालुका १३ हजार ५९३ शेतक-यांनी १ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये, देवणी तालुका ६ हजार १२४ शेतक-यांनी ६७ लाख ७३ हजार रुपये, जळकोट तालुका २ हजार ३१९ शेतक-यांनी २७ लाख १२ हजार, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील ६ हजार ९७३ शेतक-यांनी ७३ लाख ४२ हजार रुपये पिक विमा भरणा जिल्हा बँकेच्या विविध शाखेत तब्बल आजतागायत ६९ हजार ५८८ शेतक-यांनी ७ कोटी ८२ लाख ४१ हजार रुपये पिक विमा भरणा केलेला असून पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.

पिक विमा भरून घ्यावा
पिक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै असली तरी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी आपल्या गावात जावून जवळच्या जिल्हा बँकेच्या शाखेत संपर्क साधून पिक विमा भरणा करावा. त्यासाठी स्थानीक गावातील सोसायटी किंवा शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या