35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरलातूर शहरात ७० हून अधिक ठिकाणी शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅली

लातूर शहरात ७० हून अधिक ठिकाणी शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅली

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात लोकशाहीचा गळा घोटा बहुमाच्या जोरावर अतिश्य घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत. या शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरोधात दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील ७० हूनअधिक ठिकाणी शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील १० हजार गावांत एकाचवेळी आयोजित या रॅलीस औरंगाबाद येथून मराठवाडा विभागाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबोधीत केले. लातूर शहरात या उपक्रमाला शेतकरी व नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून केंद्र सरकारने शेतक-यांवर तीन कायदे लादले आहेत. कामगारांच्याही विरोधात कायदा केला आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी व कामगारविरोधी कायद्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सूचनेनूसार लातूर जिल्हा व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर शहरात ७० हूनअधिक ठिकाणी शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी एलसीडीची व्यवस्था करण्यात आली होती. शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅलीचे मराठवाडा विभागाचे प्रमुख राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी औरंगाबाद येथून ऑनलाईन संवाद साधला. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनीही संवाद साधला.

२३६ कोरोना बाधितांना उपचारानंतर सुट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या