21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरशेतक-यांंनी पिकांची अचुक नोंदणी करावी: जटाळे

शेतक-यांंनी पिकांची अचुक नोंदणी करावी: जटाळे

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शेत पिकांची अचूक नोंदणी करणारा ई-पीक पाहणी प्रकल्प शेतक-यांसाठी उपयुक्त ठरणारा असून याची व्यापक जनजागृती करण्यासाठी महसूल विभागातील कर्मचारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतक-यांना माहिती देत आहेत. शेतक-यांनी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार अतुल जटाळे यांनी केले.

यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, मंडळ अधिकारी सुनील लाडके, तलाठी विजया सुर्यवंशी, शिवशंकर शिंदे,शेख यांच्यासह बेवनाळ येथील शेतकरी उपस्थित होते. वस्तुस्थितीदर्शक शेत पिकांची नोंदणी झाल्याने विविध नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतक-यांंना योग्य मोबदला देण्यासाठी या नोंदी उपयुक्त ठरणार आहेत. तलाठ्याची या अंमलबजावणीतील भूमिका महत्वपूर्ण असून साधन व्यक्ती म्हणून प्रभावी काम करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या व शेतक-यांंनी स्वत:च ऑनलाईन आपल्या पीकांची नोंद घेऊन तलाठ्याला माहिती द्यावी, असे सांगितले. माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ हे ब्रीद वाक्य असलेल्या शेतक-यांना सहज सुलभतेने कृषीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सर्व माहिती उपलब्ध करुन देणा-या या प्रकल्पाची व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही तहसीलदार जटाळे यांनी संबंधितांना केल्या.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या