26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर शेती व्यवसाय फायद्याचा ठरण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा

शेती व्यवसाय फायद्याचा ठरण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा

एकमत ऑनलाईन

लातूर : कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून, परवडणारी फायद्याची शेती करण्यासाठी शेतकरी बांधवानी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असे आवाहन, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शेतावर महिद्रा अ‍ॅन्ड महिद्रा कंपनीच्या ऊसरोप लागवड यंत्र प्रातयक्षिक कार्यक्रम बुधवार दि. १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत झाला यावेळी त्या बोलत होत्या.

प्रारंभी महिद्रा अ‍ॅन्ड महिद्रा कंपनीच्या ऊसरोप लागवड यंत्राचे ऊसरोप लागवड प्रात्याक्षिक कार्यक्रम झाला. यंत्राव्दारे कोसी ८६०३२ ऊसरोपांची लागवड करण्यात आली. यावेळी कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील माईनकर यांनी इटालीयन तंत्रज्ञानाचा वापर करुन यंत्राव्दारे ऊसरोप लागवड कशी होते या संदर्भातील प्रात्यक्षिकासह माहिती दिली. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील माईनकर व शक्ती टॅक्टर्सचे प्रोप्रारायटर आदित्य बंडेवार यांच्या सोबत ऊसरोप लागवड यंत्राच्या माध्यमातून आधुनिक व किफायतशीर ऊसशेती, व्यवसायीक संधी व रोजागरनिर्मीती होण्यासाठीच्या संधी, तसेच ऊसरोप यंत्रासाठी येणारा खर्च, शासन अनुदान व कर्ज उपलब्धता आदी बाबत सविसत्र चर्चा केली.

यावेळी पूढे बोलतांना कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख म्हणाल्या, ऊसरोप यंत्राव्दारे ऊसरोप लागवड केल्यास शेतक-यांना किफायतशीर दरात ऊस लागवड करता येते, वेळेत, खर्चात बचत होते, एकरी उत्पादकता वाढण्यास मदत होते. शंभर टक्के रोप उगवण क्षमता ठेवण्यासाठी, नियोजित आंतरावर रोपाची लागवड व सरीतील योग्य आंतर ठेऊन आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवड करून एकरी उत्पादकता वाढीसाठी सभासद व ऊसउत्पादक शेतक-यांनी यंत्राव्दारे ऊस रोप लागवड करावी, तसेच या माध्यमातून शेतकरी आणि बेरोजगार युवकांना रोजागारनिर्मीती आणि व्यवसायीक संधी निर्माण होणार आहेत. येणा-या काळाची पाऊले ओळखुन सभासद व ऊसउत्पादक शेतक-यांनी यंत्राव्दारे ऊसरोप लागवड करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

ऊसरोप लागवड यंत्र शेतक-यांना किफायतशीर
महिद्रा अ‍ॅन्ड महिद्रा कंपनीचे ऊसरोप लागवड यंत्राचे प्रात्याक्षिक कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील माईनकर यांनी दाखवुन प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, यंत्राव्दारे ऊसरोप लागवड करण्यासाठी एकरी ३ ते ४ तास लागतात यामुळे वेळेत बचत होवुन लवकर ऊस लागवड होते. एकरी साधरनता १ हजार ५०० रूपये खर्च येतो यातुन मनुष्यबळ वाचून खर्च कमी होते. इटालीयन तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्र बनवले आहे. ऊसरोपाची लागवड करीत असतांना स्वयचलीत यंत्राव्दारे ऊसाचे योग्य आंतर ठेऊन लागवड आणि सरी पाडली जाते. यामुळे ऊगवण क्षमता जास्त असुन ऊसउत्पादकांना एकरी ऊसाचा ऊतारा जास्त मिळतो. अशा प्रकारच्या इटालीयन तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सर्वश्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक जे. एस. मोहिते, संचालक अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, कुसुमताई कदम, सुभाष माने, दगडूसाहेब पडीले, भैरवनाथ सवासे, माजी संचालक रामचंद्र सुडे, मुख्य शेतकी अधिकारी कल्याणकर, ऊसविकास अधिकारी कदम, जहागिरदार यांच्यासह कारखाना सभासद, शेतकरी, ऊस तोडणी ठेकेदार, कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी मानले.

परभणीला पहिल्या टप्प्यात साडेनऊ हजार कोविड लसींचे डोस मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या