26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरनुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहू नये

नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहू नये

एकमत ऑनलाईन

निलंगा : अतिवृष्टी, सतत पडणारा पाऊस त्याचबरोबर गोगलगाय व
किड प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात बहुतांश शेतक-यांंची पिकेधोक्यात आली आहेत. परिणामी अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली असतानाही शेतक-यांच्या हातातून खरीपाचा हंगाम जाण्याची शक्यता आहे. शासनाने सदर परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये याची विशेष खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

निलंगा येथील पंचायत समितीच्या सभागृहात विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोळवे, जल्हिा कृषि अधीक्षक दत्तात्रय गवसाने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्यासह विभाग प्रमुख व अधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, शेतक-यांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सरकारने दिलेली असून सध्याच्या परिस्थितीमुळे बहुतांश शेतकरी अडचणीत आल्याचे पाहण्यास मिळत आहे.

शेतक-यांना या अडचणीत मदतीचा हात शासनाच्या वतीने पुढे करण्यात आला आहे. शासनाने शेतक-यांना आवश्यक असणारी मदत मिळावी याकरिता पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टी, सततचा पडणारा पाऊस परिणामी गोगलगाय व किड प्रादुर्भाव यामुळे शेतक-यांंना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतक-­यांच्या हातातून खरीप हंगाम जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी अशी सूचना आमदार निलंगेकर यांनी केली. कृषि विभाग आणि महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्रा धरून शेतक-यांना सरसकट मदत मिळावी या दृष्टीने आवश्यक असणारा अहवाल आणि प्रस्ताव प्रशासनाने तात्काळ शासनाकडे सादर करावा असे सांगून हा प्रस्ताव शासनदरबारी मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आपण करू अशी ग्वाही माजी मंत्री आमदार निलंगेकरांनी यावेळी दिली.यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई करू नये असेही त्यांनी सांगितले.

शासनाकडून मिळणा-या नुकसारपाईसोबतच पीकविमा कंपनीकडूनही शेतक-यांना कशा पद्धतीने मदत मिळेल याकरिता कृषि विभाग आणि महसूल विभागाने एकत्रीत बैठक घेऊन पीकविमा कंपनीला याबाबत आवश्यक असणा-या सूचनाही द्याव्यात असे आमदार निलंगेकर यांनी या बैठकीत केल्या. पीकविमा कंपनीकडून मदत मिळावी याकरिता शासनस्तरावर आवश्यक असणारा पाठपुरावा आणि त्याकरिता विमा कंपन्यांना आवश्यक असणारे निर्देश देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. सध्याच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक जलाशयामध्ये
मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. आगामी काळातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जलाशयात पाणीसाठा वाढण्याची शक्याता आहे. मागील काळातील अनुभव लक्षात घेता जलाशयातील अतिरिक्त होणारा पाणीसाठा वेळोवेळी सोडण्यात यावा जेणेकरून शेतक-याना पुन्हा एकदा संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. याबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढवा घेऊन गरज पडल्यास तात्काळ पाणी सोडण्याच्या सूचनाही आमदार निलंगेकर यांनी यावेळी दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या