25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरशेतक-यांनी आपल्या बांधावर फळझाडाची लागवड करावी

शेतक-यांनी आपल्या बांधावर फळझाडाची लागवड करावी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूरमधील वनक्षेत्र अत्यंत कमी आहे वनक्षेत्र वाढविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. वृक्षलागवडीच्या या मोहीमेत सहभाग घेऊन शेतक-यांनी आपल्या बांधावर फळझाडांची लागवड करावी, यातून पर्यावरण संवर्धना सोबत शेतक-यांना आर्थिक फायदा देखील होईल, असे प्रतिपादन ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि.,च्या संचालीका व गोल्ड के्रस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे. त्या विलासराव देशमुख फाऊंडेशन, लातूर ‘ट्री’च्या व अंकूर नर्सरीच्या माध्यमातून वृक्ष वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

पर्यावरण संवर्धनासाठी भौगोलीक क्षेत्राच्या ३० एवढे असणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यातील वनक्षेत्र प्रमाण ०.१७ एवढे आहे. भौगोलीक क्षेत्राच्या तुलनेत हे वनक्षेत्र कमी असल्यामुळे वृक्षलागवड मोहीम वाढविण्यासाठी विलासराव देशमुख फाऊंडेशन व लातूर ‘ट्री’च्या माध्यमातून वृक्ष लागवड चळवळ राबविण्यात येत आहे. या चळवळीस चालना देण्यासाठी ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि.,च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कूल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २९ जुलै रोजी लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील शेतक-यांना १ हजार फळझाडे व अंकूर नर्सरीच्या वतीने ५०० फळझाडाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि.,च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कूल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधीकारी पृथ्वीराज बी. पी., संस्थेच्या समनवयक संगीता मोळवणे, अंकुर हायटेक नर्सरीचे संचालक धनंजय राऊत, गावचे सरपंच दादाराव पवार, उपसरपंच धनराज पाटील, अविनाश देशमुख, डॉ.दीपक देशमुख उपस्थित होते.

यावेळी ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कूल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांनी शेतक-यांनी आपल्या शेतातील बांधावर, पडीक जमीन व रीकामे असलेल्या क्षेत्रावर फळझाडाची लागवड करावी. यामुळे शेतक-यांना फळझाडापासून मोबदला मिळू शकतो. शिवाय लातूरमधील वृक्ष लागवडीमध्ये वाढ होवून पर्यावरण संवर्धनास मदत होईल असे सांगितल. या कार्यक्रमास नरसिंगे सर, जाधव सर, अमीर शेख, पार्वती होळकर, स्वामी मॅडम, सुचिता झुंजे, सोशल प्लॅनर गजानन बोयणे, मीर करपुडे, सोमनाथ झुंजे, संगमेश्वर झुंजे, रविकुमार शिंदे, ज्ञानेश्वर पवार, भुजबळ श्रीकांत, महादेव मसलकर, प्रशांत वाघमारे, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या