21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरशेतक-यांनी निश्चींत राहावे, सरकार आपल्या पाठीशी

शेतक-यांनी निश्चींत राहावे, सरकार आपल्या पाठीशी

एकमत ऑनलाईन

औसा : प्रतिनिधी
शासकीय नियमात ढगफुटी व गोगलगायमुळे नुकसान झाल्यास मदतीची तरतूद नसल्याने याबाबत झालेल्या नुकसानीची मदत शेतक-यांना वेगवेगळ्या मार्गाने देण्याचा प्रयत्न आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी एनडीआरएफच्या माध्यमातून तसेच ढगफुटीने नुकसानीसाठी संततधार पावसांच्या नियमाने मदत होईल. याचबरोबर विमा नियमानुसार अपेक्षित उत्पन्नात सरासरीच्या पन्नास टक्के घट असल्यास पन्नास टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे. या नियमानुसारही शेतक-यांना मदत होईल. त्यामुळे शेतक-यांनी निश्चींत राहावे, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

दि. ६ ऑगस्ट रोजी आमदार पवार यांनी पोमादेवी जवळगा, हसलगण, सारणी, नांदुर्गा, मंगरूळ, गुबाळ आदी ठिकाणी शंखी गोगलगाय, ढगफुटी व संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहाणी केली. या दौ-यात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी पाटील, औसा तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सारडा, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, सरचिटणीस संजय कुलकर्णी, माजी जि. प. सदस्य बंकट पाटील, कल्लिारी कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार, परिक्षीत अभिमन्यू पवार, तुराब देशमुख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन अनसारवाडे, बालाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. हे सरकार येताच जलयुक्त शिवार, सौरउर्जा योजना, शेतीमधील वीजजोडणी आदी शेतकरी हिताच्या योजनेबद्दल कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला.औसा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जलयुक्त शिवार योजनेला गती देण्याचे काम हाती घेण्यात येईल यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.तसेच किल्लारी साखर कारखाना लवकर सुरू करण्याबाबत हालचाली सुरू होतील. असे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी संबंधित गावातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या