26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरशेतक-यांंनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे

शेतक-यांंनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : ज् ियात मोठ्या प्रमाणात पारंपारिक शेती केली जाते. शेतक-यांंनी पारंपारिक शेती सोबतच पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग आदी व्यवसायावर भर देत शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे. जोडधंद्याची सांगड शेतीसोबत घातल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, यासाठी जिल्हा बँकेचे संचालक, सोसायटीचे चेअरमन यांनी शेतक-यांंना शेती पुरक व्यवसाची माहिती समजावून सांगावी, जिल्हा बँक त्यांच्या पाठीशी उभी राहिल असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

जिल्हा बँकेच्या शिरूर अनंतपाळ शाखेत आयोजित तालुक्यातील जिल्हा बँकेचे संचालक व सोसायटी चेअरमन,संचालकांच्या सत्कार समारंभात आमदार धिरज देशमुख बोलत होते.मंचावर प्रदेश सचिव अभय साळुंके,जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड.प्रमोद जाधव, संचालक व्यंकटराव बिरादार,जयेश माने,अनूप शेळके,तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर,विजय देशमुख,प्रविण पाटील,सचिन दाताळ, लक्ष्मणराव बोधले उपस्थित होते. या प्रसंगी शिरूर अनंतपाळ विशाल सोसायटीत सर्व जागा ंिजकलेले पॅनल प्रमुख रामकिशन गड्डीमे, साकोळचे चेअरमन कल्याणराव बरगे, डिगोळचे चेअरमन बाबासाहेब पाटील, तळेगाव दे.चेअरमन अनंतराव शिंदे,वांजरखेडा येथील चेअरमन भास्कर कदम, राणी अंकुलगाचे चेअरमन जयद्रथ शेंडगे, बेवनाळचे चेअरमन कडाजी पाटील व लक्ष्मणराव बोधले यांचा जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा बँक नेहमीच शेतकरी हितासाठी अग्रेसर राहिली असून यापुढे ही शेतक-याना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी काम करणार असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार, वैशंपायन जागले, नगरसेवक सुधीर लखनगावे, दिलीप गड्डीमे,राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला,अशोक कोरे, रमेश सोनवणे,बँक कर्मचारी भाटकर, मुंगे, गटसचिव वैजनाथ चवळे, शिवराज डोम,भारत बैजगिरे, शब्बीर पटेल, ज्ञानेश्वर पाटील,व्यंकटमामा कल्ले, गोपाळ ंिलबापूरे, शम्मू पटेल, विविध सोसायटीचे संचालक यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या