33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home लातूर शेतक-यांना सरकारकडून मदत मिळवून देणार

शेतक-यांना सरकारकडून मदत मिळवून देणार

एकमत ऑनलाईन

निलंगा : खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी निलंगा तालुक्यातील नुकसानीचा पाहणी दौरा केला. शेतक-यांच्या व्यथा ऐकून त्यांनी धीर देत या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

निलंगा तालुक्यात चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक वाहून गेले असून शेकडो शेतक-यांचे उसाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा दौ-यावर असून सोमवारी दि १९ रोजी त्यांनी तालुक्यातील दादगी, लिंबाला, भुतमूगळी, बोरसुरी, ताडमुगळी, कल्मुगळी, माने जवळगा,सावरी, माकणी थोर आदी अतिवृष्टी भागात झंझावती दौरा करून नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी करून शेतक्यांना धीर देत शासन दरबारी आपली व्यथा मांडून राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

छत्रपती संभाजी राजे यांनी सर्वप्रथम निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन करताच निलंगा वाशियांच्या वतीने जोरदार घोषणा देत छत्रपती संभाजी राजे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.

मराठा सेवा संघाच्यावतीने देण्यात आले निवेदन
छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष एम. एम. जाधव यांनी निलंगा तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांची थोडक्यात व्यथा मांडून त्यांना एक निवेदन देण्यात आले. यावेळी विनोद सोनवणे, सुबोध गाडीवान , अंकुश धनुरे , अंबादास जाधव, कुमोद लोभे, डॉ. उद्धव जाधव, डॉ. सचिन बसुदे, अंकुश धानुरे, कुलदीप सूर्यवंशी, उल्हास सूर्यवंशी,अजित लोभे आदी उपस्थित होते.

जिव्हाळा परिवाराच्या दगडूने मनोरुग्णाला दिले सौंदर्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या