27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरशेतक-यांना लवकरच नुकसानीची मदत मिळेल

शेतक-यांना लवकरच नुकसानीची मदत मिळेल

एकमत ऑनलाईन

अहमदपूर/चाकूर :अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्यासमवेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांचे लातूरकरांच्या वतीने स्वागत केले. यावेळी शेतक-यांची दयनीय व्यथा मंत्रीमहोदयासमोर मांडली. यावेळी त्यांनी शेतक-यांना नुकसानीचा मोबदला देण्याबाबत आश्वासीत केले. अहमदपूर-चाकूर या मतदारसंघात बसलेल्या अतिवृष्टीचा फटका आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांची व्यथा आणि खरी परस्थिीती अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यासमोर मांडली. अहमदपूर मतदारसंघातील शेतक-यांना सरसकट मोबदला देण्याची मागणी त्यावेळी केली.

यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार शिवानंद बिडवे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव,जि.प.सदस्य मंचकराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ, शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, निवृत्तीराव कांबळे, शिवाजीराव खांडेकर, इमरोज पटवेकर, अविनाश देशमुख, वसंतराव शेटकार, अभय मिरकले, चेअरमन तुळशीराम भोसले, शिवदर्शन स्वामी, संदीप शेटे, दयानंद पाटील, वष्णिुकांत तिकटे, बालाजी गुंडरे, कोंडीबा पडोळे, बबन बिलापट्टे, माधव सरवदे, मक्का स्वामी, सुमित वाघ, सतीश नवटक्के, गंगाधर ताडमे, देवानंद जाधव, बाळासाहेब बेडदे, संग्राम गायकवाड, सचिन पडीले, युवराज घोगरे, फेरोज शेख, अफरोज शेख, शेखर जाधव, आबा जाधव आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या