22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमनरेगांतर्गत योजनांचा लाभ शेतक-यांना मिळणार

मनरेगांतर्गत योजनांचा लाभ शेतक-यांना मिळणार

एकमत ऑनलाईन

निलंगा : शेतक-यांना समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मनरेगा योजनेतील वैयक्तीक योजनांवर लाभ एका शेतक-याला घेता येऊ शकतो. शंभर टक्के अनुदानाच्या या योजना दुर्दैवाने गेल्या वीस ते पंचवीस वर्षात कुठल्याही राज्यकर्त्यांनी शेतक-यापर्यंत पोहोचविल्या नाहीत. यासाठी केंद्र सरकारने भरीव निधीची तरतूद केल्याचे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगा तालुक्यातील माळेगाव (कल्याणी) व कलमुंगळी येथे दि.७ मे रोजी मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियाना निमित्त शेतक-यांशी बोलताना केले आहे.

यावेळी ओम बिराजदार, लाला शेख, नितीन पाटील, श्रीहरी जाधव, भाजप कासारसिरसी मंडळाच्या महिला अध्यक्षा कल्पना ढविले, तालुका कृषी अधिकारी श्रीनिवास काळे, श्रीमंत मोरे,बालाजी बिराजदार, प्रशांत गुंडे, सरपंच सरस्वती उगडे, उपसरपंच बळीराम मिरकले, दिपक ढविले, अनिल शिंदे, गणपती किनगे, किसनराव पाटील, दत्ता पोस्ते, विष्णू शिंदे, मिंिलद होगाडे, राजेंद्र नारायणपुरे, परमेश्वर मगे, अशोक ढविले, सरपंच राजेंद्र सूर्यवंशी, उपसरपंच सतिश मुळे, किसन पाटील, अभय तांबोळी, मारुती पाटील,मैनुद्दीन पटेल, रमेश अवले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की, शेतक-यानी मनरेगाच्या योजनेतून फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्न, शेततळे च्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय, गांडूळ व कंपोस्ट खत योजनेतून कृत्रिम खत तर गोठा योजनेतून सुरक्षित जनावरांना आसरा यासह २७ विविध योजनेतून शंभर टक्के अनुदानीत योजनेचा फायदा घेणे आवश्यक आहे. या योजनेसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ८० हजार कोटींची तरतूद केली आहे. विशेषता या सर्व योजना एकाच सातबारावर एकाच शेतक-यांना घेता येऊ शकतात यामुळे कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचा चमूसह आपण या अभियानातून मतदारसंघातील शेतक-याशी संवाद साधत आहोत.

शेतक-यांच्या शेताला शेतरस्ते असले पाहिजेत. शेत तिथे शेतरस्ते या अभियानातून संपूर्ण मतदारसंघात सुरू असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून सोळा महन्यिात ८८५ शेतरस्त्यांचे कामे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात आमदारांनाऔशाच्या शेतरस्ते अभियानाची उत्सुकता आहे. मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी शेतरस्त्यांसाठी जोडला जावा जेणेकरून रास वेळेवर झाली पाहिजे, माल वेळेवर विकला पाहिजे व शेतक-यांच्या खिशात वेळेवर पैसा आला पाहिजे. हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे. यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध असून आपली तिजोरी या कामासाठी खुली असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगून शेतरस्ते हे अभियान १ मे २०२३ पर्यंत राबविले जाणार आहे. या अगोदर शेतक-यांनी शेतरस्ते तयार करून घ्यावे १ मे नंतर मात्र आपण वीज अभियान हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या