18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरबहुभूधारक शेतक-यांनाही मिळणार फळबाग योजनेचा लाभ

बहुभूधारक शेतक-यांनाही मिळणार फळबाग योजनेचा लाभ

एकमत ऑनलाईन

औसा : प्रतिनिधी
शेतक-यांच्या आर्थिक समृद्धीसाठी फळबाग लागवड हि अत्यंत महत्वाची योजना असून मनरेगातून फळबाग लागवड करताना अल्पभूधारक शेतकरी असल्याची अट असून आघाडी सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना बंद केल्यापासून बहूभूधारक शेतक-यांसाठी फळबाग लागवड करण्याच्या योजना नसल्याने हि योजना पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून आघाडी सरकारच्या काळापासून पाठपुरावा सुरू होता. याचबरोबर सध्याचे नवीन सरकार राज्यात आल्यावर १८ जुलै रोजी मुंबई येथील उच्चस्तरीय अधिका-यांच्या बैठकीत याविषयीचा पाठपुरावा त्यांनी केला होता. त्यांच्या या पाठपुरव्यास यश आले असून हि योजना पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी निधीची तरतूदही सरकारने केली आहे.

औसा विधानसभा मतदारसंघातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीच्या दुष्टीने सातत्याने नव्या संकल्पना व योजना सरकार पुढे ठेवून त्या राबविण्यासाठी आमदार झाल्यापासून आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघासह राज्यातील शेतक-यांना त्याचे फायदे झाल्याचे दिसून येत आहे. मनरेगा अंतर्गत योजना तसेच जनावरांचा गोटा योजना आशा अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी शेतक-यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठीची भूमिका सरकारपुढे मांडली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आघाडी सरकारने बंद केलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी आघाडी सरकार मधील तत्कालीन कृषिमंत्री व रोहयोमंत्री यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता.

यानंतर १८ जुलै रोजी मुंबई येथील उच्चस्तरीय अधिका-यांच्या बैठकीत यावर पाठपुरावा करीत हि योजना बहुभूधारक शेतक-यांसाठी फायद्याची असल्याचे सांगून हि योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुरव्यास अखेर यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी हि योजना पुन्हा सुरू करीत यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी १०४.५ कोटी रूपयांचा निधीची तरतूदही केली आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांचे आभार मानले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या