27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूररासायनिक खताच्या भाववाढीने शेतकरी हवालदिल

रासायनिक खताच्या भाववाढीने शेतकरी हवालदिल

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी अशी म्हण आहे तसेच शेतक-यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते परंतु आज बळीराजाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. देशातील शेतक-यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शेतक-यांना दर पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणीसाठी बियाणेसोबत खते लागतात परंतु या खताच्या किमती कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत.

यामुळे खत कसा खरेदी करावा हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे या भाववाढीने शेतक-याचे आर्थिक कंबरडे मोडणार असल्याचे दिसून येत आहे . हवामान खात्याने २७ मे रोजी मान्सूनचे आगमन केरळमध्ये होईल असा अंदाज व्यक्त केला आहे . यामुळे यावर्षी महाराष्ट्रामध्ये लवकरच मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळेच शेतकरी आपल्या शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक शेतक-यांना वेध लागले आहे ते बियाणे खरेदीचे तसेच खत खरेदीचे यासाठी शेतकरी हा पैशाची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येत आहे.

मात्र गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतक-याच्या शेतामध्ये काहीच पिकले नाही यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात आहे अशा परिस्थितीत या वर्षी खताच्या भावाने उच्चांक गाठला असल्यामुळे शेतकरी अधिकचचिंताग्रस्त बनला आहे. यावर्षी डीएपी चे एक पोते तेराशे पन्नास रुपयाला झाले आहे तर महाधन चौदाशे रुपये घेऊन याचा भाव १९०० रुपयांवर गेला आहे . सर्वसाधारण खताच्या किमती या दोनशे ते चारशे रुपयांनी वाढल्या आहेत . युरीयाचे भाव
मात्र गतवर्षी एवढेच कायम राहिले आहेत.

गतवर्षीपेक्षा यावर्षी रासायनिक खतांच्या भावामध्ये वाढ झालेली आहे . २०० ते ५०० रुपये पर्यंत रासायनिक खतांच्या भावात वाढ झालेली आहे. युरीयाचे भाव मात्र कायम राहिली आहे, असे व्यापारी बालाजी कोंडावार यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या