21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरउपवासाला आर्थिक टंचाईचा फटका

उपवासाला आर्थिक टंचाईचा फटका

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी/महा एकादशी/देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. वैष्णवांना साक्षात विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लावणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी. रविवार दि. १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त उपवास करणा-यांची संख्या ही लाखोंच्या घरात असते. लातूरच्या किराणा व भूसार मालाच्या बाजारपेठेत आषाढी एकादशी उपवासासाठी भगर, शाबुदाना, शेंगदाण्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा उपवासाच्या पदार्थांचे भाव स्थिर आहेत. परंतू, उपवासाला फटका बसत आहे तो आर्थिक टंचाईचा.

आषाढी एकादशी महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा सर्वसामान्य वारक-यांपर्यंत, भक्तांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्वाचा सण आहे. विठ्ठलभक्तीत लीन झालेल्या भक्तांचा हा सोहळा म्हणजे माऊलीशी एकरुप होण्याचा भक्तीमय प्रसंग होय. आषाढी एकादशी दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरांत भजन, कीर्तन, दिंडी आदी कार्यक्रम होता. सर्वत्र भक्तीमय वातावरण असते. घरोघरी आषाढीनिमित्त उपवास केला जातो. काही संस्था, संघटना आणि व्यापारी सार्वजनिकरित्या फराळाची व्यवस्था भक्तांसाठी करतात. दरवर्षी भगर, शाबु, शेंगदाणे आदी पदार्थांची खुप मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.

दोन वर्षे कोरोनात यंदा आर्थिक मंदी
आषाढी एकादशी भक्तांसाठी उत्साहाचा दिवस असतो. माऊलीशी एकरुप होण्याचा हा दिवस भक्त उपवास करुन विठ्ठल माऊलीची भक्ती करतात. उपवासासाठी भगर, शाबुदाना, शेंगदाने आदी पदार्थ आवश्यक असतात. व्यापारी म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही हे पदार्थ बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत. गत दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी एकादशीला होणारा व्यवसाय ठप्प होता. यंदा चांगला व्यवसाय होईल, अशी अपेक्षा होती परंतु, यंदा आर्थिक मंदीचे सावट असल्याने अद्याप तरी या पदार्थाची मागणी नाही.

गतवर्षीच्या तूलनेत यंदा भगर, शाबुदाना शेंगदाण्यांचे भाव स्थिर आहेत. चांगल्या प्रतिचा भगर १०५ रुपये किलो, कमी प्रतिचा ६० रुपये किलो, उत्तम दर्जाचे शेंगदाणे १०५ रुपये किलो तर कमी दर्जाचे शेंगदाणे ९० रुपये किलो तर चांगल्या प्रतिचा शाबुदाना ५५ रुपये तर कमी प्रतिचा शाबुदाना ४८ रुपये किलो असा दर आहे. आषाढी एकादशी आवघ्या पाच दिवसांवर आली असली तरी आर्थिक मंदीमुळे मालाला उठाव नाही, असे चंद्रशेखर काशिनाथ स्वामी या दुकानाचे मालक चंद्रशेखर स्वामी यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या