25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरलग्नाचा नियम मोडल्याने वरपित्यास ५० हजारांचा दंड

लग्नाचा नियम मोडल्याने वरपित्यास ५० हजारांचा दंड

एकमत ऑनलाईन

औसा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी लॉकडाऊन कालावधीत होणारा विवाहाबाबत कडक निर्बंध लादले आहेत. २५ नातलगांच्या उपस्थित विवाह समारंभ दोन तासांच्या आत संपवावा असा नियम घालून दिलेला असतानाही विवाह समारंभात कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल औसा तालुक्यातील भंगेवाडी येथे वरपित्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची घटना औसा तालुक्यात घडली आहे.

सोमवारी दि. ३ मे २०२१ रोजी औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील निळकंठ माधवराव पाटील यांच्या मुलाचे लग्न कबनसांगवी ता. चाकूर येथील मुलीशी भंगेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना गर्दी टाळण्याचे प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडून २५ पेक्षा अधिक लोकांना लग्नात जमा केल्याने व पन्नास हजार रुपयांचा रोख दंड ग्रामसेवकाने आकारून संबंधितास दंडाची पावती दिली. लग्नासाठी २५ पेक्षा अधिक नातेवाईक जमा होऊन गर्दी झाल्याचे कळताच किनीथोटे येथील बीट अंमलदार राजेश लामतुरे , ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भंगेवाडी ता. औसा येथे लग्नात गर्दी केल्याची तक्रार अनेकांनी वरिष्ठाकडे केल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन नवरदेवाच्या वडीलांना ५० हजार रुपयांचा रोख दंड आकारला.

दंडाच्या रक्कमेची पावती ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी निळकंठ माधवराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. विवाहसोहळ्यात नियमापेक्षा अधिक लोकांना सहभागी केल्याने आर्थिक दंड आकारण्याची औसा तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. विवाहाच्या कार्यक्रमात नवरदेवाच्या पित्याला ५० हजार
रुपयांचा दंड झाल्याने औसा तालुक्यात खळबळ उडाली.

जि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या