24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरलातुरात दालमिल मशिनमध्ये अडकून महिला मजुराचा मृत्यू

लातुरात दालमिल मशिनमध्ये अडकून महिला मजुराचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पती करतात मजूरी : दोन मुलांसह राहत होत्या लातूरात

लातूर : लातुरात दालमिलमध्ये अडकून महिला मजुराचा मृत्यू झाला. शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या दालमिलमध्ये काम करताना मशिनमध्ये अडकल्याने ही दुर्दैवी घटना घडली. माया बाजूळगे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

दालमिल मशिनमध्ये दाळ ढकलत असताना माया ज्यावर बसल्या होत्या, तो पत्रा कोसळला. त्यामुळे माया बाजूळगे या मशिनमध्ये अडकल्या. मशिनमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या माया बाजूळगे यांना दोन मुलं आहेत. त्यांचे पतीही मजुरी करतात.

अपघात घडला त्या दालमिलमध्ये मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. शिवाय, मजुरांना विमा संरक्षणही नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शोकाकुल वातावरणात माया बाजूळगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read More  औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात औषधाचा घोटाळा सुरू- खासदार इम्तियाज जलील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या