25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरमोजक्याच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

मोजक्याच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील खाजगी संस्थेवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन दि. १० जून रोजी केलेले होते. परंतु काही शाळांनी त्यांना रुजू करून न घेतले नाही. तर बरेच शिक्षक समायोजन झालेल्या शाळेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांना परत समायोजनासाठी जिल्हा परिषदेने मंगळवार दि. १२ जुलै रोजी निमंत्रित केले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि. १० जून रोजी मराठी व उर्दु खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रीया पार पडली. खाजगी प्राथमिक शाळेतील समायोजणेसाठी मराठी माध्यमाचे ११४ अतिरिक्त होते. त्यापैकी ६७ शिक्षकांचे समायोजन खाजगी शाळेतील रिक्त असलेल्या जागेवर करण्यात आले. त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाच्या ४९ अतिरिक्त शिक्षकापैकी २७ शिक्षकांचे समायोजन खाजगी उर्दु प्राथमिक शाळेतील रिक्त पदावर करण्यात आले. उर्वरित मराठी माध्यमातील ४७ शिक्षक व उर्दू माध्यमातील २२ शिक्षकांचे समायोजन जागा रिक्त नसल्यामुळे करता आले नाही.

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना तात्काळ शाळेत रूजू होण्यासाठी सांगीतले होते. मात्र शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला १५ ते २० दिवस होऊनही मुख्याध्यापक विरोध करताना दिसून आले. त्यामुळे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी यांना पत्र काढून थेट शिक्षकांसह शाळून जावून शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तरीही खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा विषय मार्गी न लागल्याने या विषयाचे गांभीर्य वाढत असून शिक्षण विभागाने समायोजनाच्या संदर्भाने मंगळवार दि. १२ जुलै रोजी पुन्हा बैठक बोलावली आहे. त्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या संदर्भाने शिक्षण विभाग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तक्रारी आणि समायोजन
पुरेशा पटसंख्ये अभावी खाजगी संस्थावर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया लातूर जि. प. ने सुरू केली आहे. लातूर जिल्हयामध्ये अतिरिक्त झालेल्या खाजगी संस्थावरील शिक्षकांचे समायोजन १० जून रोजी करण्यात आले होते. या शिक्षकांना समायोजनाने इतर खाजगी संस्थेवर रुजू होण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना सामावून घेतले नाही. तसेच यापैकी काही शिक्षक नेमून दिलेल्या शाळावर तसेच संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातही उपस्थित आढळून आले नाहीत. या दोन्ही शिक्षकांना आज होणा-या समायोजनास उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तसेच कांही शिक्षकांनी आम्हाला समावून घेतले नसल्याच्याही तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ९४ शिक्षकांपैकी बोटावर मोजण्या इतक्याच शिक्षकांचे समायोजन झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या